देशातील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज; IMDb च्या यादीत नंबर 1, एकदा सुरू केलं की संपवल्याशिवाय राहणार नाही

Web Series: प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ओटीटी विश्वातही आपली छाप सोडली आहे. त्यांच्या पहिल्याच वेब सीरिजला आयएमडीबीने 2026 मधील सर्वांत लोकप्रिय भारतीय सीरिज म्हणून स्थान दिलं आहे.

| Updated on: Oct 29, 2026 | 3:25 PM
1 / 6
ओटीटी विश्वात सध्या कोणत्या वेब सीरिजची सर्वाधिक चर्चा आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. अशातच IMDb ने 2026 मधील लोकप्रिय भारतीय सीरिजची यादी जाहीर केली आहे. या यादीत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘प्रीतम अँड पेड्रो’ या सीरिजने पहिला क्रमांक पटकावला आहे.

ओटीटी विश्वात सध्या कोणत्या वेब सीरिजची सर्वाधिक चर्चा आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. अशातच IMDb ने 2026 मधील लोकप्रिय भारतीय सीरिजची यादी जाहीर केली आहे. या यादीत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘प्रीतम अँड पेड्रो’ या सीरिजने पहिला क्रमांक पटकावला आहे.

2 / 6

विशेष म्हणजे, या यादीत ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’, ‘राख’ आणि ‘एकाकी’ यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या सीरिजनीही आपली छाप पाडली आहे. राजकुमार हिरानी यांनी वेब सीरिजच्या क्षेत्रात पदार्पण केलेल्या ‘प्रीतम अँड पेड्रो’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सीरिजमध्ये राजकुमार हिरानी यांचा मुलगा वीर हिरानी, अर्शद वारसी आणि विक्रांत मेस्सी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

3 / 6

गुन्हेगारी, विनोद आणि थरार यांची सांगड घालणाऱ्या या सीरिजची कथा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. पारंपरिक पद्धतीने तपास करणारा पोलीस अधिकारी आणि तंत्रज्ञानाची जाण असलेला हॅकर यांच्या माध्यमातून कथेत मनोरंजनाचा वेगळा अनुभव मिळतो. IMDb च्या 2026 मधील लोकप्रिय भारतीय सीरिजच्या यादीत या शोने अव्वल स्थान मिळवलं आहे.

4 / 6

या यादीत ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ने दुसरं, तर ‘राख’ने तिसरं स्थान मिळवलं आहे. चौथ्या क्रमांकावर अशिष चंचलानीची ‘एकाकी’ ही सीरिज आहे. ‘टास्करी: द स्मगलर्स वेब’ने पाचवं स्थान पटकावलं आहे. याशिवाय ‘मुसाफिर कॅफे’, ‘मिर्झापूर’, ‘चिरैया’, ‘ऑपरेशन सफेद सागर’ आणि ‘आदर्श बाल विद्यालय’ यांचाही या यादीत समावेश आहे.

5 / 6

IMDb ची लोकप्रियता यादी ही प्रेक्षकांनी दिलेल्या रेटिंगवर किंवा प्रत्यक्ष ओटीटी व्ह्यूअरशिपवर थेट आधारित नसते. IMDb वरील जागतिक प्रेक्षकांच्या पेज व्ह्यूजच्या आधारे लोकप्रियतेचा अंदाज घेतला जातो. 2026 ची ही यादी 15 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीवर आधारित आहे.

6 / 6

गेल्या काही वर्षांत भारतीय ओटीटी क्षेत्रात क्राइम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर आणि कौटुंबिक कथांना प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत आहे. ‘प्रीतम अँड पेड्रो’चे अव्वल स्थान हे याच बदलत्या मनोरंजनविश्वाचे उदाहरण मानता येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us