AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या बड्या नेत्याने शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, महायुतीत राहून पाय तोडायचे…केली मोठी भीती व्यक्त

भाजपच्या आमदाराने निकालावरून चांगलंच सुनावलं आहे. प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करणाऱ्या धंगेकरांचा चांगलाच समाचार घेतल.

भाजपच्या बड्या नेत्याने शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, महायुतीत राहून पाय तोडायचे...केली मोठी भीती व्यक्त
eknath shinde news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 3:24 PM
Share

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीला पाच पैकी तीन जागांवर पराभव स्वीकारावा लागला. महायुतीमधील मित्रपक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे पराभवाला सामोरे जावं लागल्याचा आरोप सत्ताधारी नेते मंडळी करू लागले आहेत. भाजप नेते नवनाथ बन  आणि प्रवीण दरेकर यांनी थेट शिंदे गटावर पराभवाचं खापर फोडलं आहे. त्यानंतर महायुती राहून पाय तोडायचे योग्य नाही, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी शिंदे गटाला सुनावलं.

विधानपरिषदेच्या निकालानंतर प्रवीण दरेकरांनी यांनी शिंदे गटाला सुनावलं. तसेच प्रवीण दरेकरांनी धंगेकरांवर टीका केली. ‘महायुतीत राहून पाय तोडायचे, हे शेखचिल्लीसारखं आहे. फांदीवर बसून फांदी तोडायची, हे यामुळे आपला कडेलोट होतोय, याचं भान शेखचिल्लीला नसतं. असे होऊ नये, अशी टीका दरेकरांनी केली.

धंगेकरांवर टीका करताना प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, ‘रविंद्र धंगेकर यांची हिम्मत आहे का? आधी पाठिंबा द्यायचा. त्यानंतर अभिनंदन करायचं. याचा अर्थ स्पष्ट आहे. सकाळी एक जण बोलणार.. दुपारी एक जण बोलणार… तर संध्याकाळी एक जण बोलणार…तुझं माझं जमेना….तुझ्यावाचून करमेना …हे खरं आहे. एकत्र राहायचं आहे. एकमकेांवर टीका करायची. परंतु हे महायुतीत योग्य नाही. समन्वयातून वागलं पाहिजे. क्रियेला प्रतिक्रिया येत असते. शिंदे गटाने अशी भूमिका घेतल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते त्यांना मानणार नाही. त्यातून प्रतिक्रिया आली, तर महायुतीत वितुष्ट निर्माण होईल. याची दक्षता घ्यावी. महायुती म्हणून आपल्याला निवडून दिलं आहे’.

‘प्रत्येक पक्षातील नेत्याला त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. धंगेकर तुमची कुवत काय? देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत. त्यांच्यामुळे अनेक योजना येत आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जात आहे.  परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी पोटात टोकाची मळमळ…एवढा तिरस्कार असल्याने फडणवीसांच्या नेतृत्वावर येत आहात. परंतु फुटकळ…धंगेकरांच्या वक्तव्याला भीक घालत नाही. तुम्ही सूर्यावर किती थुंकलात तरी, तुमचं तोंड भाजेल. आपण हे लक्षात ठेवा. आम्ही तुमच्या नेतृत्वावर बोलत नाही. कधीच बोलणार नाही. परंतु तुमची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीसांच्या लोकप्रियतेवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत असाल, तर खपवून घेणार नाही, असे दरेकर पुढे म्हणाले.

Follow Us
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!