
प्रियंका चोपडा कार्ल अर्बन सोबत हॉलीवुड फिल्म 'द ब्लफ' मध्ये दिसणार आहे. त्याची झलक समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसते. यात चित्रपटाची एक्शन साइड दाखवण्यात आलीय. प्रियंका या चित्रपटात समुद्री डाकूच्या रोलमध्ये दिसतेय. ही एक पायरेट एडवेंचर फिल्म आहे. ( Credit : priyankachopra )

ही पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलय की, "मदर, प्रोटेक्टर, पायरेट ब्लोडी मैरीला भेटा.'द बल्फ' 25 फेब्रुवारीला प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. सर्व फॅन्स प्रियंकाला नव्या अवतारात पाहण्यासाठी एक्सायटेड आहेत.

प्रियंका या चित्रपटात हातात तलवार घेऊन वार करताना दिसतेय. चित्रपटात तिचा वेगळा अवतार पहायला मिळेल. फिल्म सेटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्यासोबत स्टारकास्ट दिसतेय. फॅन्सने तिच्या या नव्या अवताराचं कौतुक केलय.

या फोटोंमध्ये अभिनेत्री जेवणाच्या टेबलावर फॅमिली सोबत बसलेली दिसतेय. तिचे पती निक जोनस यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर करताना लिहिलय की, 'या चित्रपटात प्रियंका चोपडा किती इनक्रेडिबल आहे, हे पाहण्यासाठी जग आतुर आहे'

कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने लिहिलय की, 'मी यासाठी खूप एक्सायटेड आहे. वाट पाहू शकत नाही' दुसऱ्याने लिहिलय 'मोठ्या पडद्यावर पहायचय'. 'तुझा भरपूर अभिमान वाटतो' असं अभिनेत्रीचं कौतुक करताना एका चाहत्याने लिहिलय. 'याची मी एक वर्षापेक्षा पण जास्त काळापासून वाट पाहत होतो' सर्व फॅन्स हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.