
पुणे शहरात गुन्हेगारी मोडताना पोलिसांची दमछाक होत आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांवर अनेक कारवाया केल्या जात आहे. त्यानंतर गुन्हेगारी कमी होत नाही. आता पुणे शहरात मिळणारे अंमलीपदार्थ हा चिंतेचा विषय झाला आहे. पुणे शहरात पुन्हा मोठा ड्रग्सचा मोठा साठा मिळाला आहे.

पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. देशभरातील विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. परंतु युवा पिढीला अंमलपदार्थांच्या साखळीत ओढण्याचा प्रयत्न पुण्यात होत आहे. आता पुण्यात राजस्थानमधील तरुणाकडून ५८ लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

पुण्यात तीन दिवसांपूर्वी एक कोटीचे आफीम जप्त करण्यात आले होते. कात्रज भागात ही कारवाई झाली असताना आता लोहगाव भागात मॅफेड्रॉन, हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या एकावर कारवाई झाली आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

राजस्थानमधील असलेल्या गोपीचंद रामलाल बिश्नोई, (रा. चऱ्होली मूळ, रा. जालोर, राजस्थान) यांच्याकडून ५८ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

पथकाने गोपीचंद बिश्नोई याची झडती घेतली असता त्याच्याकडे १० लाख ७७ हजार २०० रुपये किंमतीचा ५३ ग्रॅम एम. डी. तसेच ४६ लाख ८९ हजार रुपये किमतीचा ३१२ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. त्याच्याकडून अंमली पदार्थासह दुचाकी जप्त केली.