Pune News : हत्येचा आरोपी गोळीबारातून वाचला मग पाठलाग करुन हात कापले, पुणे कोर्टाबाहेर जे घडलं ते समजून घ्या 5 पॉइंटमध्ये

Pune News : पुण्यात आज अत्यंत धक्कादायक घटना घडली. कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण जिथे त्याने न्याय मिळतो त्या कोर्टाच्या परिसरातच गोळीबार करुन एकाला संपवण्यात आलं.

| Updated on: Nov 25, 2026 | 2:10 PM
1 / 5
नेमकं काय घडलं ते समजून घ्या.  शिवाजी नगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर 4 च्या परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार झाला.  ज्या व्यक्तीवर हल्ला झाला, ती व्यक्ती हत्येच्या प्रकरणातील आरोपी होती अशी माहिती आहे.

नेमकं काय घडलं ते समजून घ्या. शिवाजी नगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर 4 च्या परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार झाला. ज्या व्यक्तीवर हल्ला झाला, ती व्यक्ती हत्येच्या प्रकरणातील आरोपी होती अशी माहिती आहे.

2 / 5

आरोपींनी कोर्ट परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार केला. ती व्यक्ती स्वत:चा बचाव करुन पळत असताना कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात त्या पीडित व्यक्तीचे दोन हात शरीरापासून वेगळे झाले. ही खूप भयानक घटना आहे

3 / 5

एकूण सहाजण या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, तिने कसाबसा स्वत:चा बचाव केला व तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी एवढ्यावर थांबले नाहीत. ते त्याच्या मागे लागले. शिवाजीनगर कोर्ट ते फॅमिली कोर्टाच्या परिसरात हा थरार घडला.

4 / 5

आरोपींनी अखेर साक्षीदाराला गाठलं. गोळीबारातून बचावलेल्या या साक्षीदारावर मग कोयत्याने हल्ला करण्यात आला. कोयत्याने त्याचे हात कापण्यात आले. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याचा मृत्यू झाला आहे.

5 / 5

पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. घटनास्थळी एक बंदूक पडलेली दिसत आहे. गुंडांवर पोलिसांचा वचक किंवा काही धाक राहिलाय का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us