Lucky Zodiac Signs : 5 डिसेंबरला राहू-केतू बदलणार चाल; ‘या’ 6 राशींचं नशीब उजळणार? नोकरी, पैसा अन् करिअरमध्ये प्रगतीचे योग
5 डिसेंबर 2026 रोजी राहू मकर राशीत तर केतू कर्क राशीत प्रवेश करणार असल्याचे ज्योतिषीय गणनेनुसार सांगितले जात आहे. या राशी परिवर्तनाचा मेष, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन या 6 राशींवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.

Rahu Ketu Gochar 2026: द्रिक पंचांगानुसार, राहू ग्रह 5 डिसेंबर 2026 रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर केतू ग्रहाचाही त्याच दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला कर्क राशीत प्रवेश होईल. राहू-केतूच्या राशी परिवर्तनाचा अनेक राशींवर परिणाम होणार असून, काही राशींसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. राहू मकर राशीत आणि केतू कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर डिसेंबर महिन्यात काही राशींच्या आयुष्यात चांगल्या काळाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मेष, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन या सहा राशींसाठी हे गोचर शुभ मानले जात आहे.
मेष: मेष राशीच्या जातकांना नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. राहू-केतूच्या गोचरानंतर तुमच्यासाठी काळ अनुकूल राहू शकतो. नवीन कामांची सुरुवात करण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे योग निर्माण होतील. व्यावसायिकांना एखादी मोठी डील मिळाल्याने आर्थिक फायदा होऊ शकतो.
मिथुन: राहू-केतूच्या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांना फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ आणि प्रमोशनची आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्याही हा काळ चांगला राहू शकतो. परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत.
कर्क: मागील काळात कर्क राशीच्या जातकांना काही अडचणी आणि तणावाचा सामना करावा लागला असेल, तर त्याचा अंत होण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल आणि मानसिक शांतता मिळू शकते. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्याही प्रगतीचे योग आहेत.
कन्या: कन्या राशीच्या जातकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. कामाला वेग येईल आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या जातकांना नशिबाची साथ मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या फायदा होण्याची शक्यता आहे. कामामध्ये यश मिळण्याचे योग आहेत. गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल मानला जात असून, योग्य गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
मीन: राहू-केतूच्या राशी परिवर्तनानंतर मीन राशीच्या जातकांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळेल. तसेच प्रवासाचे योगही निर्माण होऊ शकतात. डिस्क्लेमर: येथे देण्यात आलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. याची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी करण्यात आलेली नाही.