1, 2, 3 नोव्हेंबरला राज्यात धो धो पाऊस, चक्रीवादळाने फिरले वारे, मोठा इशारा, 13 जिल्ह्यात थेट..
Weather Alert : राज्यात हवामानात बदल होताना दिसत आहे. राज्यात पावसाने काही दिवसांपूर्वी पाठ फिरवली. आता पुन्हा पाऊस येत आहे. या पावसाने दिलासा मिळाला. त्यातच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

अर्नब चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात बघायला मिळत आहे. काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच आज पुन्हा भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पावसाचा येलो अलर्ट आज जारी करण्यात आला.
राज्यातील जवळपास भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. आज नागपूर, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊल होईल.
या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
अर्नब चक्रीवादळामुळे पाऊस कायम आहे. यासोबतच 2 आणि 3 नोव्हेंबरलाही पावसाची शक्यता आहे. आज चक्रीवादळाची प्रणाली आंध्र प्रदेशात येण्याची शक्यता आहे.
ज्यामुळे त्याची तीव्रता अधिक वाढेल. राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस अत्यंत महत्वाचा ठरत आहे. या चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान देखील झाले.