Raj Thackeray : अमित ठाकरे राज ठाकरे यांचा रक्षाबंधन उत्साहात, चाहत्यांनी फोटो केले व्हायरल

| Updated on: Aug 11, 2022 | 2:24 PM

आज संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होताना दिसत आहे. राज ठाकरे यांना बहिण जयवंतीने औक्षण करून राखी बांधली.

1 / 4
भारतात आज सगळीकडे रक्षाबंधन उत्साहात साजरं केलं जात आहे. सकाळपासून सोशल मीडियावर अनेकांनी रक्षाबंधन साजरा केल्याचे फोटो टाकले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या घरी देखील रक्षाबंधन साजरा झाला आहे. राज ठाकरे यांच्या बहिणीने त्यांना राखी बांधली आहे. तर अमित ठाकरे यांना बहिण उर्वशी ठाकरे यांनी राखी बांधली आहे.

2 / 4
राज ठाकरे यांना त्यांची मोठी बहिण जयवंती देशपांडे यांनी औक्षण करून राखी बांधली. राज ठाकरे यांचे फोटो त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केले आहेत.

3 / 4
राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना बहिण उर्वशी ठाकरे यांनी राखी बांधली. नुकताच अमित ठाकरे यांनी राज्याचा दौरा केला. त्यामुळे त्यांच्या देखील लोकप्रियतेमध्ये भर पडली आहे. ज्यावेळी उर्वशी ठाकरे या राखी बांधत आहेत, त्यावेळी त्या दोघांमध्ये संवाद सुरु आहे.

4 / 4
मागच्या काही दिवसांपासून ऑपरेशन झाल्यापासून राज ठाकरे घरी आहेत. अनेक नेत्यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. तसेच त्यांची राजकारणात देखील अधिक चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट घेतली आहे.