दिशा सालियन प्रकरणात आदित्यंवर आरोप, अमित ठाकरेंचा भावाला ठाम पाठिंबा; पहिली प्रतिक्रिया चर्चेत

दिशा सालियन प्रकरणात CBI ने FIR दाखल केल्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी त्यांचे चुलत भाऊ आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 18, 2026 | 8:33 PM
1 / 5
दिशा सालियान प्रकरणात सीबीआयने नवा एफआयआर दाखल करताच, आता अमित ठाकरेंनी चुलत भाऊ आदित्य ठाकरेंसाठी थेट मैदानात उडी घेतली आहे.
"माझा भाऊ अशा कोणत्याही चुकीच्या किंवा बेकायदेशीर गोष्टीत सामील असूच शकत नाही," असा ठाम विश्वास व्यक्त करत अमित यांनी आदित्य ठाकरेंना जाहीर पाठिंबा दिला आहे.

दिशा सालियान प्रकरणात सीबीआयने नवा एफआयआर दाखल करताच, आता अमित ठाकरेंनी चुलत भाऊ आदित्य ठाकरेंसाठी थेट मैदानात उडी घेतली आहे. "माझा भाऊ अशा कोणत्याही चुकीच्या किंवा बेकायदेशीर गोष्टीत सामील असूच शकत नाही," असा ठाम विश्वास व्यक्त करत अमित यांनी आदित्य ठाकरेंना जाहीर पाठिंबा दिला आहे.

2 / 5

माध्यमांशी बोलताना एका भावाच्या नात्याने अमित ठाकरेंनी आदित्य यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून कुठलाही पुरावा नसताना आदित्य यांचं नाव या प्रकरणात गोवणं, हा निव्वळ राजकीय डाव आणि बदनामीचा प्रकार असल्याचा घणाघात त्यांनी केला.

3 / 5

दिशा सालियानच्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने नुकताच एफआयआर नोंदवला आहे. तसे असले तरी, सीबीआयने नव्याने दाखल केलेल्या या ताज्या एफआयआरमध्ये अद्याप कोणत्याही संशयित आरोपीचे नाव देण्यात आलेले नाही.

4 / 5

या संपूर्ण प्रकरणावर आदित्य ठाकरेंनीही आपली रोखठोक भूमिका मांडत हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आणि पूर्णपणे तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. केवळ राजकीय आकसापोटी आपली बदनामी केली जात असून, 'मी दिशा सालियानला कधीही भेटलो नाही किंवा ओळखतही नव्हतो,' असा स्पष्ट दावा आदित्य यांनी केला आहे.

5 / 5

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान हिचा ८ जून २०२० रोजी इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेला आता सहा वर्षे उलटून गेली असली, तरी काही विरोधकांकडून जाणीवपूर्वक या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव ओढून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न अद्यापही सुरूच आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us