Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’च्या कमाईची घोडदौड सुरूच; 5 दिवसांत रितेश देशमुखच्या चित्रपटाने किती कमावले?
अभिनेता रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' सध्या थिएटरमध्ये चांगली कामगिरी करतोय. वीकेंडनंतर या चित्रपटाच्या कमाईत हळूहळू वाढ होत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घ्या..

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. मात्र पहिल्या आठवड्यातील दमदार कामगिरी आणि पहिल्या सोमवारच्या दमदार परफॉर्मन्सनंतर मंगळवारी या चित्रपटाच्या कमाईत घट दिसून आली.

'राजा शिवाजी'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 11.35 कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवश 10.55 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 12 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 5.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'राजा शिवाजी'ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 4.90 कोटी रुपये कमावले आहेत.

'राजा शिवाजी'ची पाच दिवसांनंतरची एकूण कमाई आता 44.40 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर एकूण ग्रॉस कलेक्शनचा आकडा 52.68 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पुढील एक-दोन दिवसांत हा चित्रपट कमाईचा 50 कोटींचा टप्पा पार करेल, अशी अपेक्षा आहे. परंतु नेट कलेक्शनच्या बाबतीत 100 कोटींचा टप्पा पार करणं या चित्रपटाचं मुख्य लक्ष्य असेल. कारण मराठी चित्रपटासाठी ही खूप मोठी बाब असेल.

येत्या काही आठवड्यांत कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्यामुळे 'राजा शिवाजी'च्या कमाईचा मार्ग आणखी सोपा असेल. 1 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून याचं दिग्दर्शन रितेश देशमुखनेच केलं आहे. यामध्ये त्याच्यासोबत जिनिलिया देशमुख, संजय दत्त, भाग्यश्री, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, विद्या बालन यांच्या भूमिका आहेत.

'राजा शिवाजी' हा रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो या चित्रपटावर काम करत होता. परंतु या चित्रपटाची भव्यता उल्लेखनीय असली तरी काही गोष्टींच्या बाबतीत कमतरता जाणवल्याची भावना प्रेक्षक-समिक्षकांनी व्यक्त केली आहे. 'राजा शिवाजी'मधील व्हीएफएक्स कमकुवत असल्याचं म्हटलं गेलंय.