Ramayana Box Office Collection Day 13: आदिनाथ कोठारेचा ‘रामायण’ सिनेमा सुसासाट, 13व्या दिवशी केली छप्परफाड कमाई

Ramayana Box Office Collection Day 13: सध्या रामायण या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आता चित्रपट प्रदर्शित होऊन 13 दिवस उलटले आहेत तरही चित्रपटाची कमाई थांबायचे नाव घेईना...

| Updated on: Nov 18, 2026 | 8:43 AM
1 / 5
मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे महत्त्वाच्या भूमिकेत असलेला 'रामायण' हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईन 13 दिवस उलटले आहेत. तरी देखील चित्रपटाची कमाई कमी होण्याचे नाव घेत नाहीये.

मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे महत्त्वाच्या भूमिकेत असलेला 'रामायण' हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईन 13 दिवस उलटले आहेत. तरी देखील चित्रपटाची कमाई कमी होण्याचे नाव घेत नाहीये.

2 / 5

ताज्या ट्रेड आकडेवारीनुसार, १३ व्या दिवशी भारतातील २२,५५१ शोच्या माध्यमातून 'रामायण' चित्रपटाने २८.७० कोटी रुपयांची नेट कमाई केली. यामध्ये हिंदी शोचे सर्वात मोठे योगदान राहिले. १७,८६७ शोमधून २१ कोटी रुपये कमावले.

3 / 5

१३ व्या दिवसाच्या एकूण देशांतर्गत नेट कमाईमध्ये हिंदी भाषेचा वाटा ७३.२ टक्के होता. उर्वरित कमाई इतर चार भाषांमधून आली. मल्याळम भाषेने १,०७० शोमधून २.३५ कोटी रुपये कमावले, तर कन्नड भाषेने ८९४ शोमधून २.१० कोटी रुपयांची कमाई केली. तमिळ भाषेचे योगदान १,१६८ शोमधून १.७५ कोटी रुपये राहिले आणि तेलगू भाषेने १,५५२ शोमधून १.५० कोटी रुपये कमावले आहेत. यासह 'रामायण'ची भारतातील एकूण नेट कमाई ८२१.३० कोटी रुपये झाली आहे, तर भारतातील याचे ग्रॉस कलेक्शन ९८१.५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

4 / 5

परदेशात चित्रपटाने १३ व्या दिवशी १२ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली, ज्यामुळे याचे एकूण आंतरराष्ट्रीय ग्रॉस कलेक्शन ५०२ कोटी रुपये झाले आहे. यासह चित्रपटाचे जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन १,४८३.५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, जगभरात नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच भारतात ५०० कोटींचा टप्पा ओलांडला होता.

5 / 5

चित्रपटने पहिल्या आठवड्यात जवळपास ५६४.६० कोटी रुपये नेट आणि सुमारे ६७५.०५ कोटी रुपये ग्रॉसची कमाई केली. आता आपल्या दुसऱ्या आठवड्यात 'रामायण'ने भारतात आतापर्यंत ३१०.२० कोटी रुपये नेट कमावले आहेत. जगभरात याचे ग्रॉस कलेक्शन १,५०० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले असून, हा चित्रपट एका खास क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे. हा टप्पा ओलांडताच 'रामायण' सर्वात कमी वेळेत अशी कामगिरी करणारा केवळ पाचवा भारतीय चित्रपट बनेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us