Ramayana: ‘रामायण’ सिनेमात रिक्षा चालकाची मुलगी, भूमिकेने चमकलं नशीब
Ramayana: बॉलिवूडमधील रामायण हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात एका रिक्षा चालकाची लेक देखील दिसली आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? वाचा

सध्या 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला रामायण हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक पात्राची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात एक अशी अभिनेत्री आहे जी सर्वसामान्य कुटुंबातून आली आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? चला जाणून घेऊया...
आम्ही रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या रामायण सिनेमातील माँ सीतेची छोटी बहिण श्रुतकीर्तीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत. ही भूमिका अभिनेत्री सुरभी दासने साकारली आहे.
सुरभी दासचा ही मूळची आसामाची आहे. तिचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. तिचे वडिल हे रिक्षा चालक आहेत. संपूर्ण घर हे वडिलांच्या कमाईवर चालत असे. लहानपणापासूनच सुरभीचा संघर्ष सुरु होता.
सुरभीचा इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या हेतूने तिने काम करण्यास सुरुवात केली. कारण नोव्हेंबर 2022मध्ये सुरभीच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले.
सुरुवातीला सुरभीने शिक्षिका म्हणून काम सुरु केले. तिने कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले. सोबतच तिने यूट्यूबवर व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. तिचे हे व्हिडीओ अनेकांनी पाहिले. 2021मध्ये सुरभीला 'नीमा डेन्जोंगपा' या लोकप्रिय मालिकेत लीड रोल मिळाला. त्यानंतर ती 'पंड्या स्टोअर' या मालिकेतही दिसली.
काही दिवसांनंतर सुरभीला रामायण या सिनेमात श्रुतकीर्तीच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले. सुरभीचा इथपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता.