Horoscope Today 4th August 2026 : मंगळवारी हमखास मिळणार बाप्पाचे आशीर्वाद, आज जुना वाद मिटणार.. या राशींचा मनस्ताप टळणार
Horoscope Today 4th August 2026, Tuesday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य. दैनिक राशिफल (Horoscope Today 4th August 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.

मेष राशी (Aries Daily Horoscope) - तुमच्या आयुष्यातील एखादे मोठे रखडलेले काम अचानक पूर्ण होऊ शकते. मालमत्ता किंवा घराशी संबंधित विषयात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रेमाच्या बाबतीत मात्र थोडे जपून पाऊल टाका. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास गैरसमज वाढू शकतात. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. मेहनत वाढेल, पण एखादी मनातील इच्छा पूर्ण होऊन आनंद मिळेल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) - एखादी मनासारखी खरेदी तुमचा मूड बदलू शकते. कुटुंबातील नात्यांमध्ये गोडवा वाढेल आणि घरात शुभ वातावरण निर्माण होईल. गणरायाचा आशीर्वाद मिळेल. वाहन, घराची दुरुस्ती किंवा नवीन सुरुवातीसाठी दिवस अनुकूल आहे. दीर्घकाळ अडकलेला व्यवहार मार्गी लागू शकतो. मात्र आरोग्याच्या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) - आज कामाचा ताण वाढेल, पण योग्य वेळी मदत मिळेल. खर्च वाढू शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन करा. दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. मुलांच्या बाबतीत अधिक लक्ष द्या. सरकारी कामे करताना घाई न करता प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) - कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कौशल्याची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे.मनात सहकार्याची भावना ठेवल्यास प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. छोट्या गोष्टींचा ताण घेऊ नका. कुटुंबातील वातावरण सुधारेल आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल दिसतील. जुने वाद आज हमखास मिटतील.

सिंह राशी (Leo Daily Horoscope) - आज तुमच्या निर्णयांमध्ये आत्मविश्वास दिसेल. मात्र मनातील चिंता आणि गोंधळावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. योग्य नियोजन केल्यास मोठे यश मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा, विशेषतः रक्तदाब आणि साखरेची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मोठ्या , चांगल्या संधीचा ठरेल. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत निवडीची संधि मिळू शकते.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) - आरोग्याला प्राधान्य द्या; पोटाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही काम घाईत करू नका. तुमच्या योजना आणि गुपिते सर्वांसोबत शेअर करणे टाळा. लक्ष केंद्रित ठेवल्यास यश तुमच्या बाजूने असेल.

तुळ राशी (Libra Daily Horoscope) - सकाळपासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. जुने वाद संपतील, कामांना गती मिळेल आणि तुमच्या जबाबदारीचे कौतुक होईल. करिअरमध्ये प्रगती किंवा पदोन्नतीची संधी मिळू शकते.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) - गोड बोलण्याच्या कौशल्यामुळे तुम्ही मोठ्या अडचणी सहज पार करू शकता. मालमत्तेच्या विषयात सकारात्मक चर्चा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी यशाचे नवे मार्ग खुलतील. मात्र वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) - जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधा. कोणतीही गोष्ट लपवणे टाळा. अडकलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे. व्यवसायात वाढ होईल आणि नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. मात्र वडिलांशी मतभेद टाळा.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) - नोकरी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी मिळू शकते. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीची संधी मिळण्याची शक्यता आहे. नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर मोठे लक्ष्य गाठता येईल. मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जुने वाद आज मिटतील, कुटुंबातील दुरावा संपेल. मोठा मनस्ताप कमी होईल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) - समस्यांचे समाधान मिळेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली संधी येऊ शकते. नवीन वाहन किंवा एखादे मोठे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो.

मीन राशी (Pisces Daily Horoscope) - खर्च वाढण्याची शक्यता असल्याने पैशांचे नियोजन करा. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला नवी ओळख मिळेल. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अनोळखी व्यक्तींच्या सल्ल्यावर लगेच विश्वास ठेवू नका. दिवसाच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी तुमचा मूड बदलू शकते. जुने वाद आज संपतील. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)