
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने गुलाबी ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत.

रश्मिका मंदाना हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

सध्या अभिनेत्री तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे. भगव्या गुलाबी रंगाच्या अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत आली आहे. पण दोघांनी अद्याप नात्याचा अधिकृत स्वीकार केलेला नाही.

रश्मिका फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, सोशल मीडियावर देखील कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रश्मिका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.