Ravi Kishan: त्यांच्या चित्रपटांचे वेगळे अर्थ असायचे, प्रत्येक विनोदात…दादा कोंडकेविषयी रवी किशन स्पष्टच म्हणाले

Ravi Kishan News: रवी किशनने नुकतीच कोण होणर करडोपती या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये त्याने दादा कोंडकेविषयी एक विधान केले आहे,

| Updated on: Nov 26, 2026 | 10:25 AM
1 / 5
कोण होणार करोडपती या शोमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. आता या शोच्या विशेष भागात गोरखपूरचे खासदार आणि अभिनेता रवी किशनने हजेरी लावली.

कोण होणार करोडपती या शोमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. आता या शोच्या विशेष भागात गोरखपूरचे खासदार आणि अभिनेता रवी किशनने हजेरी लावली.

2 / 5

या शोमध्ये त्यांनी माधुरी दीक्षितसोबत गप्पा मारताना दादा कोंडकेविषयी आपले मत मांडले. मराठी अभिनेते आणि विनोदवीर दाद कोंडके यांच्या विनोदशैलीवर रवी किशनने भाष्य केले.

3 / 5

रवी किशन म्हणाले की" त्यांचे विनोद आणि डायलॉग डिलिव्हरी जबरदस्त होती. त्यांच्याविषयी विशेष प्रेम आणि आदर आहे. मला त्यांचे भाबड्या नाम्या हे पात्र खूप आवडतें."

4 / 5

"लोकांनी नेहमीच त्यांच्या चित्रपटातील डायलॉगचे वेगळे अर्थ काढले, पण त्यांच्या नजरेतून जर पाहिले तर प्रत्येक विनोदात एक संदेश असायचा." असं रवी किशनने बोलून दाखवले.

5 / 5

हा एपिसोड २८ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे, आता या एपिसोडमध्ये आणखी काय किस्से पाहायला मिळतात हे लवकरच कळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us