
लग्नानंतर सासू आणि सुनेमध्ये मतभेद होणं ही एक फार सामान्य गोष्ट आहे. सासू-सुनेच्या भांडणात जेव्हा आपला नवरा आईचीच बाजू घेतो, तेव्हा ही परिस्थिती अधिक कठीण होते. त्यामुळे अशावेळी वाद घालण्यापेक्षा समजूतदारपणा दाखवून सगळ्यांची मनं जिंकणं महत्त्वाचं असते.

जेव्हा नवीन लग्न होते, तेव्हा खटके उडणं हे स्वाभाविक असते. पण सुनेने कधीच सासूला विरोधक समजू नये. ती तुमच्या कुटुंबाचा भाग आहे, हे समजून घ्या. तिला आदर द्या. प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारण्याऐवजी ती हसून गोष्ट टाळा. यामुळे घरातलं वातावरण बिघडत नाही.

तुमच्या सासूच्या आवडीनिवडी समजून घ्या. त्यांना चहा आवडत असेल तर तो वेळेवर करुन द्या. या लहान लहान गोष्टी केल्याने तुम्ही त्यांच्या मनात स्थान मिळवता येईल. तसेच त्यांचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलेल.

घरातल्या कामांमध्ये मदत करा. सासरी गेल्यानंतर त्या ठिकाणी सून म्हणून आपली कर्तव्य नेहमी पार पाडा. यामुळे तुम्हाला घराची काळजी आहे, हे सासूला जाणवेल. त्यानंतर ती तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकेल.

नवऱ्याकडे सासूची तक्रार करण्याऐवजी त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्यात गैरसमज झाला असेल तर प्रेम आणि आदरामुळे तो दूर करा. वाद घालणं टाळा.

कुटुंबाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सासूचा सल्ला घ्या. त्यांची मतं महत्त्वाची आहेत, हे त्यांना जाणवून द्या. यामुळे तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर वाढेल.

सण, कौटुंबिक कार्यक्रम किंवा घरगुती कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घ्या. सासूलाही त्यात सामील करा. त्यांच्या आवडीची काळजी घ्या. यामुळे नात्यात गोडवा येईल.

जर तुम्हाला राग आला असेल तर त्या क्षणी शांत राहा. योग्य वेळेची वाट बघा. त्यानंतर समजूतदारपणाने विषय हाताळा. सासूला चुकीचं ठरवण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधा. नातं एका दिवसात बदलत नाहीत. प्रेम, समजुतदारपणा आणि वेळेच्या मदतीने तुम्ही सगळ्यांच्या मनात जागा बनवू शकता.