माझी वेडी बायको.. मी वयस्कर होतोय, तू मात्र..; जिनिलियासाठी रितेश देशमुखची भन्नाट पोस्ट

Riteish and Genelia Deshmukh: अभिनेत्री जिनिलिया देशमुखच्या वाढदिवसानिमित्त रितेशने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. जिनिलिया तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. रितेशने तिच्यासोबतचे काही खास फोटोसुद

| Updated on: Aug 05, 2026 | 2:53 PM
1 / 5
अभिनेत्री जिनिलिया देशमुख आज (5 ऑगस्ट) तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. जिनिलियासोबतचे फोटो शेअर करत रितेशने त्याचं प्रेम मजेशीर अंदाजात व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री जिनिलिया देशमुख आज (5 ऑगस्ट) तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. जिनिलियासोबतचे फोटो शेअर करत रितेशने त्याचं प्रेम मजेशीर अंदाजात व्यक्त केलं आहे.

2 / 5

'माझी प्रिय बायको, आपण एकत्र अनुभवलेल्या, जपलेल्या आणि निर्माण केलेल्या आठवणींवर मी नजर टाकत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की फक्त मीच वयस्कर होत चाललो आहे. पण काळाच्या ओघात तू मात्र अगदी पूर्वीसारखीच राहिली आहेस. अर्थात तुला उत्तम पती लाभला आहे, हेच त्यामागचं खरं कारण असावं', असं कॅप्शन रितेशने या फोटोंना दिलं आहे.

3 / 5

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने पुढे लिहिलं, 'आमच्या कुटुंबाला एकसंध ठेवणाऱ्या व्यक्तीला.. एक सुपर मॉम, अप्रतिम मुलगी, प्रेमळ बहीण आणि माझ्या वेड्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.'

4 / 5

रितेशच्या या पोस्टवर जिनिलियानेही तिच्याच अंदाजात कमेंट केली आहे. 'माझा पती जगात सर्वोत्तम आहे, कोणालाही विचार. नवरा म्हणून माझ्या आयुष्यात येण्यासाठी धन्यवाद', अशा शब्दांत जिनिलियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

5 / 5

जिनिलिया आणि रितेशने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया आणि रितेश यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव राहील असं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us