
RRR या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेल्या 'नाटू नाटू' या गाण्याचा गायक राहुल सिप्लिगुंज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. राहुलने 17 ऑगस्ट रोजी प्रेयसी हरिणी रेड्डीशी साखरपुडा केला. या साखरपुड्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते.

राहुल आणि हरिणी यांनी सोशल मीडियावर या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये राहुल त्याच्या गुडघ्यांवर बसून हरिणीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे. या दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

आणखी एका फोटोमध्ये राहुल त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या हाताला किस करताना दिसून येतोय. या दोघांचा रोमँटिक अंदाज पाहून ही जोडी 'मेड फॉर इच अदर' असल्याचे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

'आमची नवी सुरुवात.. नेहमीसाठी', असं कॅप्शन देत दोघांनी साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या दोघांनी अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली नाही.

'झूम' वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राहुलची होणारी पत्नी हरिणी ही चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. ती एका राजकीय कुटुंबातील आहे. 17 ऑगस्ट रोजी हैदराबादमधील आयटीसी कोहिनूर या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला.