Saif Ali Khan : करीना अन् मुलांसोबत सैफ अली खानची फ्रान्समध्ये धमाल! व्हेकेशनचे खास फोटो केले शेअर

Saif Ali Khan : इन्स्टाग्रामवर डेब्यू केल्यापासूनच सैफ अली खान सातत्याने पोस्ट करत आहे. आता त्यान त्याच्या फ्रान्स व्हेकेशनचे काही फोटो शेअर केलेत. पत्नी करीना आणि मुलांसोबत सैफ निवांत मूडमध्ये दिसतोय.

| Updated on: Oct 26, 2026 | 4:19 PM
1 / 5
अभिनेता सैफ अली खान सध्य फ्रान्समध्ये सुट्टी घालवतोय. संपूर्ण कुटुंबासह तो व्हेकेशनला गेला आहे. पत्नी करीना आणि तैमूर-जेह सोबत तो रिलॅक्स होऊन सुट्ट्या एन्जॉय करतोय. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुट्टीचे फोटो शेअर केलेत.

अभिनेता सैफ अली खान सध्य फ्रान्समध्ये सुट्टी घालवतोय. संपूर्ण कुटुंबासह तो व्हेकेशनला गेला आहे. पत्नी करीना आणि तैमूर-जेह सोबत तो रिलॅक्स होऊन सुट्ट्या एन्जॉय करतोय. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुट्टीचे फोटो शेअर केलेत.

2 / 5

सैफ अली खानने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत त्यासोबत हटके कॅप्शनही लिहिलं आहे. आपल्या मिश्किल अंदाजात अभिनेत्याने लिहिलं की, “आता हे मिश्र संकेत आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जात आहे. शेवटी, एकाच दिशेची निवड तरी का करायची? जेव्हा चौकात बसून प्रत्येक दिशेचा उत्तम नजारा अनुभवता येतो!”

3 / 5

पुढे सैफने लिहिलं, “नुई-सेंट-जॉर्ज (Nuits-Saint-Georges) येथील द्राक्षांच्या वेलींच्या परिसरात मी स्वतःलाच हरवून बसलो. इथला प्रत्येक नवा रस्ता म्हणजे बरगंडी वाइनची आणखी एक बाटली शोधण्यासाठी भरकटण्याचं नवं निमित्त! आता सांगा बरं, पहिल्या स्लाइडवर लिहिलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही किती बारकाईने वाचल्या?”

4 / 5

या फोटोंमध्ये सैफ अली खान मस्ती मस्तीभऱ्या अंदाजातही दिसला. एका फोटोमध्ये त्याने पत्नी करीनासह पोझ दिली. ते दोघे नुकतेच कपिल शर्माच्या 'द ग्रेट कपिल शर्मा शो' मध्येही दिसले होते.

5 / 5

तर पुढल्या एका फोटो त्यांची मुलं, तैमूर आणि जेह हे दोघे लायब्ररीमध्ये बसून पुस्तक वाचातना दिसले. सैफ आणि करीना, फ्रान्समध्ये त्यांच्या काही मित्र-मैत्रीणींनाही भेटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us