Salman Khan Net Worth: सलमान खान या मार्गांनी कामावतो पाण्यासारखा पैसा… जाणून व्हाल अवाक्

गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ज्यातून अभिनेत्याची मोठी कमाई होते. पण सलमान खान फक्त सिनेमांच नाही तर इतर मार्गांनी देखील गडगंज पैसा कमावतो... आज सलमान खान याचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Dec 27, 2025 | 12:23 PM
1 / 5
सलमान खानने 2007 मध्ये बीइंग ह्यूमन हे स्वतःचं फाउंडेशन सुरू केलं. तो हृदय शस्त्रक्रिया, क्रॅनियोफेशियल उपचार, नेत्र शिबिरे आणि कर्करोगाच्या रुग्णांना मदत करतो. हे फाउंडेशन त्यांच्या विक्रीतून सामाजीक कामे करते.  बीइंग ह्यूमनचे कपडे देखील लोकप्रिय आहेत.

2 / 5
सलमान खान याने भारतात SK-27 ही जिमची साखळी सुरू केली. त्यानंतर लवकरच अभिनेत्याने फिटनेस उपकरणेही लाँच केली. यामुळे त्याच्या कमात मोठी वाढ झाली आणि फिटनेसला प्रोत्साहन मिळते.

3 / 5
सलमान खान केवळ सिनेमांमध्ये काम करत नाही तर त्यांची निर्मितीही करतो. त्याने 2011 मध्ये स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस उघडले. या बॅनरखाली त्याने चिल्लर पार्टी ते बजरंगी भाईजान पर्यंत असंख्य सिनेमांची निर्मिती केली.

4 / 5
सलमान खानचा स्वतःचा ग्रूमिंग आणि पर्सनल केअर ब्रँड देखील आहे. त्याने कोविड- 19 महामारी दरम्यान FRSH लाँच केले, ज्यामध्ये हँड सॅनिटायझर्सपासून ते परफ्यूमपर्यंत विविध उत्पादने उपलब्ध होती.

5 / 5
सलमान खान याच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे तब्बल 2 हजार 900 कोटींची संपत्ती आहे. शिवाय अभिनेत्याच्या कार कलेक्शनमध्ये देखील  अनेक महागड्या गाड्या आहेत. एवढंच नाही तर, भाईजानकडे बुलेटप्रुफ गाडी देखील आहे.