अभिनय क्षेत्राला रामराम करणार होता भारतीय क्रिकेटपटूचा लेक; दुसऱ्याच दिवशी कबीर खान यांचा फोन अन् सगळं बदललं! खास किस्सा काय?

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा आणि अभिनेता चिराग पाटील अभिनयक्षेत्र सोडण्याचा विचार करत होता. मात्र, दिग्दर्शक कबीर खान यांच्या ‘83’ सिनेमाच्या ऑफरने त्याचा निर्णय बदलला. या सिनेमात चिरागला वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पत्नी सनाच्या सल्ल्यामुळे त्याने ही भूमिका स्वीकारली आणि त्याच्या करिअरला नवं वळण मिळालं.

| Updated on: Oct 06, 2026 | 9:09 PM
1 / 5
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील हा मराठी अभिनेता आहे. चिराग पाटीलने आतापर्यंत काही मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात त्याच्या काही सिनेमांना अपेक्षित यश मिळालं नाही.

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील हा मराठी अभिनेता आहे. चिराग पाटीलने आतापर्यंत काही मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात त्याच्या काही सिनेमांना अपेक्षित यश मिळालं नाही.

2 / 5

यामुळे चिरागने अभिनयक्षेत्र सोडण्याचा विचार केला होता. चिरागने हा निर्णय पत्नी सनाला देखील सांगितला होता. सनाने चिरागच्या निर्णयाचा आदर करत त्याला योग्य वाटत असेल तर पुढे जाण्याचा सल्ला दिला.

3 / 5

मात्र, दुसऱ्याच दिवशी दिग्दर्शक कबीर खान यांचा चिरागला फोन आला. कबीर खान यांनी चिरागला ‘८३’ या सिनेमासाठी भेटायला बोलावलं. या सिनेमात वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारण्याची संधी चिरागला मिळणार होती.

4 / 5

चिरागने ही भूमिका साकारावी, अशी त्याच्या आई-वडिलांचीही इच्छा होती. पत्नी सनानेही ही मोठी संधी सोडू नकोस, असा सल्ला चिरागला दिला. पत्नीच्या सल्ल्यानंतर चिरागने ‘८३’ सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला.

5 / 5

या भूमिकेसाठी चिरागने निर्मात्यांकडे अधिक मानधनाची मागणी केली आणि ती मान्य करण्यात आली. ‘८३’ सिनेमाने चिरागच्या अभिनय कारकिर्दीला नवं वळण मिळालं आणि त्याला वडिलांची भूमिका साकारता आली. चिराग पाटीलने ‘येक नंबर’, ‘वजनदार’ आणि ‘अकिरा’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us