
बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने 2018 मध्ये केदारनाथ या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सारा अली खान हिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका देखील केल्या आहेत.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सारा अली खान हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. सारा अली खान हिचा भाऊ इब्राहिम अली खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे साराने म्हटले.

सारा अली खान म्हणाली की, इब्राहिम अली खान याने त्याच्या चित्रपटाचे शूटिंग नुकताच पूर्ण केले आहे. या चित्रपटात अब्राहिम अली खान हा मुख्य भूमिकेत असल्याचे देखील सारा हिने सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होत्या की, इब्राहिम अली खान हा बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार असून करण जोहर हा त्याला लाॅन्च करणार आहे. आता यावर साराने खुलासा केलाय.

इब्राहिम अली याच्या चित्रपटाबद्दल अजून जास्त माहिती ही मिळू शकली नाहीये. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा मुलगा हा इब्राहिम अली खान हा आहे.