Sara Tendulkar : सारा तेंडुलकरच्या बर्थडे लूकची चर्चा ! झेब्रा प्रिंट ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, सानियाच्या स्टायलिश लूकनेही वेधलं लक्ष

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने आपला 29वां वाढदिवस खास अंदाजात साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोमध्ये ती झेब्राच्या प्रिंटची मिनी ड्रेस घालुन खूप सुंदर दिसली. या सेलिब्रेशनमध्ये तिची मैत्रीण आणि आता भावजय सानिया चंदोकसोबत तिने धमाल केली. झेब्रा प्रिंटच्या स्टायलिश मिनी ड्रेसमधील साराचा लूक आणि पाळीव कुत्र्यांसोबतचे तिचे गोड क्षण चर्चेत आहेत. त्यांच्यातील घट्ट मैत्री आणि ग्लॅमरस पार्टीने चाहत्यांचे लक्ष वेधले.

| Updated on: Oct 13, 2026 | 3:46 PM
1 / 10
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने नुकताच आपला 29 वा वाढदिवस खास अंदाजात साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही खास फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंमध्ये सारा तिची जवळची मैत्रीण आणि आता भावजय बनलेली सानिया चंदोक हिच्यासोबत धमाल करताना दिसत आहे. दोघींमधील सुंदर बॉन्डिंग चाहत्यांना विशेष आवडत आहे. याशिवाय, साराच्या स्टायलिश मिनी ड्रेसनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ( All Photos : Insgram / Sara Tendulkar)

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने नुकताच आपला 29 वा वाढदिवस खास अंदाजात साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही खास फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंमध्ये सारा तिची जवळची मैत्रीण आणि आता भावजय बनलेली सानिया चंदोक हिच्यासोबत धमाल करताना दिसत आहे. दोघींमधील सुंदर बॉन्डिंग चाहत्यांना विशेष आवडत आहे. याशिवाय, साराच्या स्टायलिश मिनी ड्रेसनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ( All Photos : Insgram / Sara Tendulkar)

2 / 10

कालच सचिन तेंडुलकरने एक खास पोस्ट लिहीत साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिचं बरंच कौतुकही केलं होतं. त्याच्या या पोस्टवर अनेक लाइक्स आल्या, अनेक चाहत्यांनी साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

3 / 10

सारा तेंडुलकर आणि सानिया चंदोक या एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. आता त्यांच्या नात्याला नणंद-भावजय अशी नवी ओळखही मिळाली आहे. त्यामुळे दोघींमधील खास नातं चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. साराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सानियाने सोशल मीडियावर तिच्या सेलिब्रेशनमधील काही खास क्षण शेअर केले.

4 / 10

सारा आणि सानिया दोघींनाही प्राण्यांची विशेष आवड आहे. त्यांच्या घरीही दोन पाळीव कुत्रे असून, त्या अनेकदा त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. याशिवाय, साराच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या सेलिब्रेशनमध्ये कुटुंबीयांसह तिचे जवळचे मित्रही सहभागी झाले होते.

5 / 10

वाढदिवसाच्या पार्टीसाठी सारा आणि सानिया या दोघींनीही स्टायलिश आउटफिट्सची निवड केली होती. त्यांच्या फॅशन सेन्सने उपस्थितांसह सोशल मीडियावरील चाहत्यांचेही लक्ष वेधून घेतले. साराने झेब्रा प्रिंटचा मिनी ड्रेस परिधान करून बोल्ड आणि ट्रेंडी लूक साकारला होता. दुसरीकडे, सानिया ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये अत्यंत एलिगंट दिसत होती. दोघींनीही आपल्या आउटफिट्ससोबत कमीत कमी अ‍ॅक्सेसरीज वापरल्या होत्या. त्यामुळे त्यांचा लूक साधा असूनही आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत होता.

6 / 10

सारा तेंडुलकरने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी काळ्या आणि ऑफ-व्हाइट रंगाचा झेब्रा प्रिंट मिनी ड्रेस निवडला होता. ड्रेसवरील आकर्षक प्रिंट आणि त्याची मिनी लांबी यामुळे तिच्या लूकला मॉडर्न आणि ट्रेंडी टच मिळाला होता. या ड्रेसमध्ये लांब शीअर स्लीव्ह्ज आणि रफल्ड टेक्स्चर देण्यात आले होते. तसेच, ड्रेसच्या बॅकलेस डिझाइनमुळे तिच्या आउटफिटला ग्लॅमरस लुक मिळाला. साराने या ड्रेससोबत अ‍ॅक्सेसरीज कमीत कमी ठेवल्या होत्या. तिने कानात हूप इअररिंग्ज घालून आपला लूक पूर्ण केला.

7 / 10

उपलब्ध माहितीनुसार, साराचा हा ड्रेस लोकप्रिय फॅशन ब्रँड झाराच्या अ‍ॅनिमल प्रिंट ट्यूल ड्रेसपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. या ड्रेसची किंमत सुमारे २,३५० रुपये असल्याचे नमूद केले जाते. तिच्या या स्टायलिश लूकची सोशल मीडियावर विशेष चर्चा होत आहे.

8 / 10

मिळालेल्या माहितीनुसार, साराचा हा ड्रेस लोकप्रिय फॅशन ब्रँड झाराच्या अ‍ॅनिमल प्रिंट ट्यूल ड्रेसपैकी एक असल्याचे सांगितलं जातं. या ड्रेसची किंमत सुमारे 2350 रुपये असल्याचे नमूद केलं जातं. तिच्या या स्टायलिश लूकची सोशल मीडियावर विशेष चर्चा होत आहे.साराच्या वाढदिवसाच्या पार्टीत सानिया चंदोकही आपल्या खास स्टाइलमुळे चर्चेत आली. तिने ऑलिव्ह ग्रीन रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. ड्रेसच्या फिटिंगमुळे तिच्या लूकला आकर्षक आकार मिळाला होता, तर फुल शीअर नेट स्लीव्ह्जमुळे आउटफिट अधिक नाजूक आणि एलिगंट दिसत होता.

9 / 10

साराने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत सानिया आणि इतर मित्रमैत्रिणींसोबत भरपूर मजा केली. तिनेही सोशल मीडियावर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मित्रमैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण घालवताना, फोटो क्लिक करताना आणि केक कापण्यापूर्वी डोळे मिटून विश मागताना दिसली

10 / 10

या सेलिब्रेशनमधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे साराच्या वाढदिवसाच्या केकवर लिहिलेला मजेशीर संदेश. तिच्या मित्रमैत्रिणींनी केकवर 'हॉट गर्ल्सचं वय वाढत नाही' असा खास संदेश लिहिला होता. त्यासोबत साराला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us