वेगळं होण्याची भीती..; 12 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सारंग साठ्येनं पॉलाशी बांधली लग्नगाठ

स्टँडअप कॉमेडियन सारंग साठ्येनं गर्लफ्रेंड पॉलाशी लग्न केलंय. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. सारंग आणि पॉला गेल्या 12 वर्षांपासून डेट करत होते.

Updated on: Oct 01, 2025 | 8:48 AM
1 / 5
लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन, अभिनेता आणि दिग्दर्शक सारंग साठ्येनं 12 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर गर्लफ्रेंड पॉल मॅकग्लिनशी लग्नगाठ बांधली आहे. 28 सप्टेंबर रोजी या दोघांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्याचे फोटो सारंगने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
'हो, आम्ही लग्न केलं. तुम्हा सर्वांना माहितंच आहे की लग्न आमच्यासाठी कधीच प्राधान्य नव्हतं. परंतु फक्त एक गोष्ट जी आम्हाला वेगळं ठेवू शकत होती तो म्हणजे कागदाचा तुकडा. मागचं वर्ष खूप कठीण होतं. जग हे संघर्षाचं ठिकाण होतं. द्वेष इतका मजबूत होता की पहिल्यांदाच आम्हाला वेगळं होण्याची भीती वाटत होती', अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

3 / 5
या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, 'द्वेषावर नेहमीच प्रेमाचा विजय होतो. आमचं प्रेम आणि मैत्री अबाधित ठेवण्यासाठी आम्हाला 28 सप्टेंबर 2025 रोजी तो कागद मिळाला. हे लग्न अत्यंत खासगी होतं. आमचे कुटुंबीय आणि काही मित्र डीप कोव्हमधील (Deep Cove) आमच्या आवडत्या झाडाभोवती जमले होते. त्या सर्वांना एकत्र आणण्याची ही एक उत्तम संधी होती.'

4 / 5
"आम्ही एकमेकांना गोष्टी सांगितल्या, गाणी गायली आणि आपण जसे आहोत तसंच राहण्याचं एकमेकांना वचन दिलं. तर ही आमची छोटीही कहाणी", असं तो पुढे म्हणाला. या पोस्टवर चाहत्यांनी सारंग आणि पॉलावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

5 / 5
सारंग आणि पॉला यांचं 'भाडिपा' नावाचं युट्यूब चॅनल अत्यंत लोकप्रिय आहे. एका जवळच्या मैत्रिणीसोबत मिळून या दोघांनी काही वर्षांपूर्वी ते चॅनल सुरू केलं होतं. लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी इतरही युट्यूब चॅनल्स सुरू केले. त्यामुळे एका अर्थाने सारंग आणि पॉला हे दोघं बिझनेस पार्टनरसुद्धा आहेत.