SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी, आजपासून नियमात बदल, जाणून घ्या

SBI खातेधारकांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. आता एसबीआयच्या नियमात आजपासून बदल होणार आहेत. जाणून घ्या माहिती

| Updated on: Oct 01, 2026 | 10:19 AM
1 / 5
तुमचं बचत खाते किंवा सॅलरी खाते एसबीआय बँकेत असेल, तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. एक ऑक्टोबरपासून एसबीआयच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. या नियमाचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

तुमचं बचत खाते किंवा सॅलरी खाते एसबीआय बँकेत असेल, तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. एक ऑक्टोबरपासून एसबीआयच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. या नियमाचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

2 / 5

एक ऑक्टोबर म्हणजे आजपासून एसबीआयच्या सॅलरी खात्याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. मोफत ट्रान्जेक्शनची मर्यादा घटवण्यात आली आहे. सॅलरी खातेधारक आणि इतर बँकांच्या एटीएम आणि ऑटोमेटेड डिपॉझिट अँड विथड्रॉवल मशीन्सवर डेबिट कार्डचा वापर करून महिन्याला फक्त पाच ट्रान्जेक्शन करू शकतील. ही मर्यादा आधी दहा इतकी होती.

3 / 5

एसबीआय खातेधारांना महिन्यातून चार वेळा पैसे काढणे मोफत असते. परंतु 4 ट्रांन्जेक्शननंतर 15 रुपयांसहित जीएसटी आकारला जाईल. फक्त एका महिन्यात 4 हून अधिक वेळा एटीएमने पैसे काढल्यास पैसे आकारले जातील. महिन्यातून पाचव्यांदा पैसे एटीएमने काढल्यास पैसे मोजावे लागतील .

4 / 5

बँकेने सॅलरी खातेदरांच्या एटीएम सुविधेवर मर्यादा आणल्या आहेत. सॅलरी खातेदारांना 5 ट्रान्जेक्शन मोफत देण्यात आले आहेत. त्यानंतर कोणत्याही ट्रान्जेक्शनवर वापरावर पैसे आकारले जातील. तुम्ही केवळ शिल्लक रक्कम जाणून घेतली तरी पैसे मोजावे लागतील.

5 / 5

सॅलरी खातेदार महिन्यातून सहाव्यांदा पैसे काढत असेल, तर प्रत्येकी ट्रान्जेक्शनमागे 23 रुपये आणि जीएसटी द्यावी लागेल. नॉन फायनान्शिअल ट्रान्जेक्शनसाठी 11 रुपयांसहित जीएसटी द्यावी लागेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us