Earth: या ठिकाणी पण जीवन; अथांग अंतराळात सापडली दुसरी पृथ्वी, शास्त्रज्ञांचा दावा काय?

Scientists Discover Earth Like Planet: या ब्रह्मांडात, अनंत, अथांग, अफाट अवकाशात, अंतराळात आपण एकटेच नाहीत. तर इतर ठिकाणी पण जीवन असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. ही दुसरी पृथ्वी आपल्यापेक्षा पृथ्वीपेक्षा 6 पट मोठी आहे.

| Updated on: Jan 29, 2026 | 4:30 PM
1 / 6
शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार,  HD 137010 ग्रह हा पृथ्वीपासून जवळपास 150 प्रकाश वर्ष दूर आहे. हा ग्रह सूर्यासारख्या ताऱ्याला फेरी मारतो. तो पृथ्वीपेक्षा जवळपास 6 पट मोठा आहे. हा ग्रह मंगळ ग्रहासारखाच अति थंड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2 / 6
ऑस्ट्रेलियाच्या साऊथ क्वींसलँड विद्यापीठाच्या (UniSQ ) एका पथकाने याविषयीचा दावा केला आहे. त्यांचा लेख हा एस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झाल्याने चर्चा सुरू झाली आहे. 'ABC न्यूज' च्या वृत्तानुसार, संशोधक चेल्सी हुआंग हिने हे एक मोठे आणि रोमांचक संशोधन असल्याचे म्हटले आहे.

3 / 6
शास्त्रज्ञांच्या मते, जर या शोधावर शिक्कामोर्तब झाले तर  HD 137010 b हा सूर्या भोवती प्रदक्षिणा घालणारा एकमेव डोंगराळ आणि जीवाणूंसाठी पोषक असलेला ग्रह ठरू शकेल.  'ABC न्यूज' च्या वृत्तानुसार, या पथकाचे प्रमुख एलेक्स वेनर यांच्या मते, HD 137010 b वर जीवन असण्याची शक्यता 50 टक्के आहे.

4 / 6
HD 137010 b हा ग्रह सूर्यसारख्या एका मोठ्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा मारतो. या ग्रहावर जीवन असण्याची दाट शक्यता आहे. येथील वातावरण हे जीवाणूंसाठी पोषक आहे. तसेच मानवी जीवनासाठी पण योग्य वाटत आहे. पण यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.

5 / 6
ऑस्ट्रेलियातील  साऊथ क्वींसलँड विद्यापीठाच्या (UniSQ) पथकाने याविषयीचे संशोधन केले आहे. प्रख्यात   एस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. या पथकातील अनेक शास्त्रज्ञ हा एक मोठा शोध असल्याचा दावा करत आहेत.

6 / 6
शास्त्रज्ञांच्या मते,  HD 137010 हा ग्रह पृथ्वीपासून जवळपास 150 प्रकाश वर्ष दूर आहे. इथं यान पाठवण्यास अनेक वर्षे खर्ची पडतील. पण दूर्बिण आणि इतर तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांनी हे संशोधन केले आहे. हा ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा सहा पट मोठा असल्याचे समोर आले आहे. पृथ्वीसारखेच मंगळावर पण जीवन असल्याचा दावा करण्यात येतो. त्यानंतर आता हा ग्रह समोर आला आहे.