Famous Nepali Actress : नेपाळच्या 5 टॉप अभिनेत्री कोण? ज्या सौंदर्यात बॉलिवूडच्या हिरॉईन्सना देतात टक्कर
Famous Nepali Actress : नेपाळ फिल्म इंडस्ट्री खूप लहान आहे. पण नेपाळी कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख बनवलीय. या स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला नेपाळच्या पाच टॉप अभिनेत्रींबद्दल सांगणार आहेत. अभिनया बरोबरच त्या आपल्या सौंदर्याने सुद्धा वेड लावतात.

Priyanka Karki : नेपाळच्या लोकप्रिय अभिनेत्रींबद्दल बोलायचं झाल्यास तर या यादीत पहिलं नाव अभिनेत्री प्रियंका कार्कीचं येतं. प्रियंका नेपाळची लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल, डायरेक्टर आणि लेखक आहे. प्रियंका कार्कीने वर्ष 2005 मध्ये मिस टीन नेपाळचा किताब जिंकलेला. तिने आपल्या करिअरची सुरुवात 2012 मध्ये आलेला चित्रपट '3 लवर्स'ने केलेली.

Aditi Budhathoki : अदिति बुधाथोकी नेपाळची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडल आहे. अदिति आपला फॅशन सेन्स आणि फिटनेससाठी ओळखली जाते. अदितिचे इंस्टाग्राम वर 22 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अदितिने 'क्री' फिल्म द्वारे नेपाळी सिनेमात पाऊल ठेवलेलं.

Shrinkhala Khatiwada : श्रृंखला खतिवडा नेपाळची पॉपुलर अभिनेत्री असण्यासह चांगली मॉडेलही आहे. वर्ष 2018 मध्ये श्रृंखलाने मिस नेपाळ वर्ल्डचा किताब जिंकलेला. इथूनच तिला फेम मिळायला सुरुवात झाली.

Keki Adhikhari : केकी अधिकारी नेपाळची सर्वात सुंदर आणि सक्सेसफुल अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 2010 साली फिल्म 'सवोर' मधून नेपाळी सिनेमात डेब्यू केलेला. केकीने 'आय एम सॉरी'आणि 'हाउ फन्नी' सारख्या फिल्मस केल्या. त्याशिवाय केकी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते.

Swastima Khadka : स्वस्तिमा खड्काने खूप कमी वयात नेपाळी इंडस्ट्रीमध्ये यश मिळवलं. तिने वर्ष 2015 मध्ये आलेला चित्रपट 'हॉस्टल रिटर्न्स' मधून नेपाळी सिनेमात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने 'बुलबुल'आणि 'दिमाग खराब' सारखे चित्रपट केले.