‘KISS करावंच लागेल’, रेमो डिसूजाची अभिनेत्रीवर बळजबरी, अभिनेत्यासोबत जबरदस्तीने रोमान्स करावाच लागला

अनेकदा रिॲलिटी शोमध्ये खोटे लव्ह अँगल दाखवण्यासाठी बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात. टीआरपीसाठी अशा गोष्टी केल्या जातात.

| Updated on: Aug 14, 2026 | 12:14 PM
1 / 5
प्रसिद्ध डान्स रिॲलिटी शो 'डान्स प्लस' मध्ये शक्ती मोहन मेंटॉरच्या भूमिकेत होती, तर लोकप्रिय डान्सर अन् अभिनेता राघव जुयाल हा या शोचे सूत्रसंचालन करत होता. यावेळचा एक प्रसंग तिने आता बोलून दाखवला आहे.

प्रसिद्ध डान्स रिॲलिटी शो 'डान्स प्लस' मध्ये शक्ती मोहन मेंटॉरच्या भूमिकेत होती, तर लोकप्रिय डान्सर अन् अभिनेता राघव जुयाल हा या शोचे सूत्रसंचालन करत होता. यावेळचा एक प्रसंग तिने आता बोलून दाखवला आहे.

2 / 5

खऱ्या आयुष्यात शक्ती आणि राघव हे खूप चांगले मित्र आहेत. परंतु, शोची टीआरपी वाढवण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मेकर्सने या दोघांमध्ये एक लव्ह रोमँटिक अँगल दाखवण्यास सुरुवात केली होती. ज्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करतात अशा अफवाही रंगल्या आहेत.

3 / 5

सुरुवातीला सर्वकाही मस्करी आणि स्क्रिप्टचा भाग वाटत होते; मात्र पुढे जाऊन एक गोष्ट घडली. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शक्ती मोहनने सांगितले की, कॅमेऱ्यासमोर तिची अजिबात इच्छा नसताना तिला राघव जुयालला किस करण्यासाठी भाग पाडले गेले.

4 / 5

शक्ती म्हणाली, "मेकर्सने स्क्रिप्टमध्ये असा सीन ठेवला होता की, मला राघवचा गालावर किस करावे लागेल. मी जेव्हा याचा विरोध केला, तेव्हा मला सांगण्यात आले की तुला हे करावंच लागणार आहे. सर्वात मोठा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा शोचे मुख्य जज रेमो डिसूजा सर म्हणाले की करुन टाक"

5 / 5

"जेव्हा हा एपिसोड ऑन-एअर झाला, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरील अस्वस्थता स्पष्ट होती कारण मला सतत काळजी वाटत होती की माझे आई-वडील हा शो पाहतील तेव्हा काय विचार करतील", असं ती म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us