
कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं शुक्रवारी (27 जून) निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं सांगितलं जात असलं तरी शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे. तिच्या अकाली जाण्याने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शेफाली जरीवाला ही सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी काही औषधं घेत असल्याचं समोर आलं आहे. ही माहिती समोर आल्यानंतर तिचं अकाली निधन आणि या औषधांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

गेल्या सात ते आठ वर्षांपासून तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी ती दोन औषधं घेत होती. या दोन्ही औषधांचा डोस काही महिन्यांच्या फरकाने घेतला जातो. मात्र ती सुंदर दिसण्यासाठी घेत असलेल्या उपचारांचा आणि प्रकृतीचा संबंध नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी शेफाली व्हिटॅमीन सी आणि गुल्टोथिओन ही दोन औषधं घेत होती. या दोन दिवसांमुळे शरीर तरुण आणि सुंदर दिसायला मदत होते, असे म्हटले जाते. मात्र तिच्या मृत्यूचा आणि ती घेत असलेल्या उपचारांचा संबंध नसल्याचं डॉक्टर म्हणत आहेत.

दरम्यान, तिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं बोललं जात आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तिच्या मृत्यूचं नेमकं खरं कारण समोर येणार आहे. तिच्या अकाली जाण्याने बॉलिवुडध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.