Shivalee Parab : गुलाबी ड्रेस, सुंदर अदा अन् किलर पोझेस! शिवाली परबचा अमेरिकेतील ग्लॅमरस अंदाज
अभिनेत्री शिवाली परब सध्या अमेरिकेच्या ट्रिपवर असून, तिच्या खास लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुलाबी फ्लोरल ड्रेसमधील तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्या या स्टायलिश अंदाजात नेमकं काय आहे खास? पाहा तिचे मनमोहक फोटो!
1 / 7

शिवाली परब ही मराठी कलाविश्वातील एक प्रसिद्ध आणि हुशार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
2 / 7
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून शिवाली परबने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
3 / 7
ती अमेरिकेतील निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्यासाठी गेली आहे आणि तिथले सुंदर क्षण अनुभवत आहे. या ट्रिपमधील तिचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 7
शिवालीने गुलाबी रंगाचा सुंदर फ्लोरल प्रिंटेड वनपीस परिधान केला आहे.
5 / 7
थंडीच्या वातावरणानुसार शिवालीने गुलाबी ड्रेससोबत काळ्या रंगाचे लेगिंग्ज आणि बूट निवडले आहेत.
6 / 7
बागेतील निळ्या बाकावर बसून हातात झाडाचे पान घेतलेली शिवालीची पोझ फोटोला वेगळे सौंदर्य देते.
7 / 7
शिवाली परबचा हा सुंदर आणि स्टायलिश लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us