
मराठी चित्रपट सृष्टीतील सौंदर्य आणि उत्तम अभिनय असा मिलाफ दाखवणारी अभिनेत्री श्रुती मराठे सध्या नवनवीन लूक्समध्ये चाहत्यांशी कनेक्ट होतेय.

श्रुती मराठेनं 2008 मध्ये ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तेव्हापासूनच श्रुती मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.

मराठी हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. बोल्ड आणि सुंदर श्रुती आपल्या मनमोहक सौंदर्यानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते.

श्रुतीला जागो मोहन प्यारे या मालिकेतून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध मिळालेली पाहायला मिळाली.

श्रुती लवकरच दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात अभिनेता गश्मिर महाजनीसोबत झळकणार आहे.