त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत सर्व प्रयत्न..; 19 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याविषयी मराठमोळी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली

2018 पासून शुभांगी आणि पियुषच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. लग्न वाचवण्यासाठी शुभांगीने बरेच प्रयत्न केले, परंतु ते सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अखेर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही ती पियुषच्या संपर्कात होती.

| Updated on: Dec 26, 2025 | 12:57 PM
1 / 5
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेनं लग्नाच्या 19 वर्षांनंतर पती पियुष पुरेला घटस्फोट दिला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात पियुषचं निधन झालं. दीर्घ काळ लिव्हर सिरॉसिस या आजाराशी झुंज दिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगी तिच्या पतीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

2 / 5
विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत शुभांगीने सांगितलं की, जेव्हा सर्व प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा या बंधनातून बाहेर पडण्याचा मी निर्णय घेतला. "मी कोणत्याच गोष्टीला अपूर्ण सोडू शकत नाही. मी प्रयत्न केलेच नाही किंवा माझे प्रयत्न कमी पडले अशी खंतच मला नको असते. असं झाल्यास मी स्वत:लाच माफ करू शकत नाही", असं ती म्हणाली.

3 / 5
"आज मी त्या नात्याबद्दल इतक्या आत्मविश्वासाने बोलू शकते कारण मला माहीत आहे की मी प्रत्येक बाजूने माझ्या नात्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. पियुषला दारुचं व्यसन होतं. तो व्यसनमुक्त व्हावा यासाठी मी सगळे प्रयत्न केले होते. काऊन्सलिंग, रिहॅब.. सर्वकाही करून पाहिलं होतं. पण काहीच उपयोग झाला नाही", असं तिने पुढे सांगितलं.

4 / 5
"आता मला पियुषशी कोणतीच तक्रार नाही. कारण जेव्हा मला अभिनेत्री व्हायचं होतं, तेव्हा त्याने माझी खूप साथ दिली होती. त्याचं कुटुंबही खूप खुश होतं. पियुषने मला माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भेट.. माझी मुलगी आशी हिला दिलं. यासाठी मी त्याची कायम ऋणी असेन. तो जिथे कुठे असेल तिथे खुश राहो अशी मी प्रार्थना करते", अशा शब्दांत शुभांगी व्यक्त झाली.

5 / 5
शुभांगीने घटस्फोटाचा निर्णय मुलीखातर घेतल्याचं स्पष्ट केलं. कारण वडिलांच्या व्यसनामुळे मुलीला एंग्झायटीचा सामना करावा लागत होता. तिच्यावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये, यासाठी तिने हा निर्णय घेतला. यासाठी समाज किंवा इतर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नसल्याचं ती म्हणाली.