
टीव्ही एक्ट्रेस श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक यांच्या सौंदर्याची नेहमी चर्चा होत असते. आज आम्ही तुम्हाला श्वेता तिवारीची स्टायलिश वहिनी दाखवणार आहोत. जी श्वेता तिवारीला सौंदर्यामध्ये टक्कर देते.

श्वेता तिवारीच्या भावाचं नाव निधान तिवारी आहे. 26 फेब्रुवारी 2020 रोजी त्याचं लग्न झालं. स्वत: श्वेता तिवारी आणि पलकने अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले. श्वेता तिवारी अनेकदा वहिनी Yasmin Shaikh सोबत वेकेशन साजरी करताना दिसली आहे. दोघांचे लंडनचे फोटो समोर आलेले.

2020 साली श्वेता तिवारीच्या भावाने यास्मिनसोबत लग्न केलं. अभिनेत्रीने कपलसोबत फॅमिली फोटो शेअर केले होते. तिच्या वहिनीची देखील युजर्सनी स्तुती केली होती. श्वेताची आपल्या वहिनीसोबत चांगली बॉन्डिंग आहे. हल्दी सेरेमनीमध्ये दोघी एन्जॉय करताना दिसलेल्या.

भावाच्या लग्नात श्वेता तिवारीने मुलगी पलकसोबत ट्विनिंग केलेलं. दोघी एकाच प्रकारच्या गाऊनमध्ये होत्या. त्यांची वहिनी व्हाइट गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती. इंडियन फंक्शनसोबत व्हाइट वेडिंग करताना दिसलेले. तिचा भाऊ सोशल मीडियावर फार सक्रीय नाहीय. पण वहिनी सतत फोटो शेअर करत असते.

दुसऱ्याबाजूला पलक तिवारीने सुद्धा मामी यास्मिनचे रिसेप्शन पार्टीचे फोटो शेअर केलेले. जिथे ती डान्स परफॉर्मन्स देताना दिसलेली. गुलाबी लहंग्यामध्ये यास्मिन खूप सुंदर दिसत होती. श्वेताना बऱ्याच काळापासून वहिनीसोबतचा फोटो शेअर केलेला नाही.