Shweta Tiwari Photos : मनमोहक in Black .. श्वेता तिवारीच्या क्लासी लूकने वेधलं लक्ष, नवे फोटो पाहून चाहते घायाळ
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी अनेकदा सोशल मीडियावर तिचे शानदार आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिने आता पुन्हा इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो अपलोड केले असून काळ्या ड्रेसमध्ये तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टायलिश अंदाजामुळे फेमस आहे. फिटनेसच्या बाबतीत ती तिची मुलगी पलक तिवारीलाही टक्कर देते. ती वेगवेगळ्या आऊटफिट्समधले फोट सोशल मीडियावर शेअर करत असेत. आजा तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती अतिशय आकर्षक दिसतये..
श्वेता तिवारी हिने आज शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लॅक आणि ब्लू रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. तिने परिधान केलेल्या ब्लॅक टॉपच्या स्लीव्ह्जवर स्टायलिश स्ट्रॅप्स लावण्यात आले आहेत. या डिझाइनमुळे तिचा लूक आणखी आकर्षक दिसतोय.
या लूकमध्ये श्वेताने तिचे घनदाट काळे केळ मोकळेच ठेवलेत. ज्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली. यासोबतच तिने हलका मेकअप केला असून कानात सिल्व्हर रंगाचे इअररिंग्स घातले. या सुंदर आऊटफिटमध्ये श्वेताने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या अंदाजात पोझ दिली.
फॅशन सेन्स आणि फिटनेससोबतच श्वेताच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर, 1999 साली आलेल्या ‘कलीरें’ या शोमध्ये तती सर्वात पहिली दिसली होती. कसौटी जिंदगी की मुळे ती घराघरांत पोहोचली आणि प्रचंड लोकप्रिय झाली.
टीव्ही मालिकांव्यतिरिक्त श्वेता तिवारी ‘मिले ना मिले हम’, ‘बिन बुलाए बाराती’ आणि ‘सिंघम अगेन’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली. यासोबतच ती ‘हम तुम एंड देम’ आणि ‘डू यू वाना पार्टनर’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्येही होती.