Amit Parab: माजी मुख्यमंत्र्यांची लेक अभिनेत्यासाठी पोहोचली मालिकेच्या सेटवर, नेमकं काय घडलं?

सध्या 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत काम करणारा अभिनेता चांगलाच चर्चेत आहे. त्याने मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं हे एका मुलाखतीत सांगितलं आहे.

| Updated on: Nov 01, 2026 | 10:03 AM
1 / 5
'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत जयकांत रांगणेची भूमिका साकारणारा अभिनेता अमित परब सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो अल्पावधीतच महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. पण ही मालिका त्याने अचानकमध्येच सोडली. त्याच्या या निर्यणामुळे अनेकांना धक्का बसला. आता अमित परबने यामागील कारणे सांगितली आहेत.

'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत जयकांत रांगणेची भूमिका साकारणारा अभिनेता अमित परब सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो अल्पावधीतच महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. पण ही मालिका त्याने अचानकमध्येच सोडली. त्याच्या या निर्यणामुळे अनेकांना धक्का बसला. आता अमित परबने यामागील कारणे सांगितली आहेत.

2 / 5

अभिनेता अमित परबने एका मुलाखतीत सहअभिनेत्रीनकडून चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या. त्या पटल्या नाहीत. त्यामुळे ऑन द स्पॉट राजीनामा दिल्याचे सांगितले. तसेच एखादी गोष्ट कॅरेक्टरवर येते तेव्हा तिथे थांबणं चुकीचं वाटतं असं तो म्हणाला.

3 / 5

अमितने एका दिवसात मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने थेट त्याचा राजिनामा निर्माते, प्रॉडक्शन हाऊस, चॅनेलला दिला. त्यामुळे सर्वजण चकीत झाले. त्याने या घटनेविषयी बोलताना हे देखील म्हटले की संपूर्ण कलाकार हे त्याच्या बाजूने उभे होते.

4 / 5

अमिने राजिनामा दिल्यानंतर मालिकेच्या निर्मात्या स्मृती शिंदे या थेट अंधेरीवरून ठाण्याला सेटवर पोहोचल्या होत्या. दोघांमध्ये चर्चा झाली. स्मृती शिंदे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.

5 / 5

आमच्या मालिकेच्या निर्मात्या सोबो फिल्म्सच्या स्मृती शिंदे खूप दयाळू आहेत. त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. त्या या प्रकरणाबाबत इतक्या संवेदनशील होत्या, की त्या ऑल द वे अंधेरीहून ठाण्याला आमच्या सेटवर आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची सुरक्षा, व्हॅनिटी असा अख्खा ताफा असतो. कदाचित एकवेळ त्यांच्या येण्याचा खर्चही १५-२० हजार रुपये असेल. पण त्या आल्या, असे अमित म्हणाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us