घनदाट जंगलातली ही वनस्पती म्हणजे सापांचा कर्दनकाळ, घराच्या बाजूला लावली की साप दुरूनच पळून जातो!

उंदीर, बेडूक हे सापाचे आवडते खाद्य आहे. हे प्राणी घराजवळ असले की तुमच्या घरातही साप येण्याची शक्यता वाढते. घराच्या आसपास दाट झुडपे, लाकडांचे ढीग आणि कचरा असल्यास सापांना लपण्यासाठी जागा मिळू शकते.

| Updated on: Oct 12, 2026 | 11:31 PM
1 / 5
साप म्हटलं की सगळेच घाबरतात. आपल्या घरात साप येऊ नये यासाठी प्रत्येकजण काहीतरी उपाय करत असतो. सापांच्या भीतीपोटी काही लोक तर तो दिसला की त्याला मारून टाकतात. परंतु जंगलात सापडणारी अशी एक वनस्पती आहे, जी तुम्ही घराजवळ लावली की साप पळून जातात असं म्हटलं जातं.

साप म्हटलं की सगळेच घाबरतात. आपल्या घरात साप येऊ नये यासाठी प्रत्येकजण काहीतरी उपाय करत असतो. सापांच्या भीतीपोटी काही लोक तर तो दिसला की त्याला मारून टाकतात. परंतु जंगलात सापडणारी अशी एक वनस्पती आहे, जी तुम्ही घराजवळ लावली की साप पळून जातात असं म्हटलं जातं.

2 / 5

उंदीर, बेडूक हे सापाचे आवडते खाद्य आहे. हे प्राणी घराजवळ असले की तुमच्या घरातही साप येण्याची शक्यता वाढते. घराच्या आसपास दाट झुडपे, लाकडांचे ढीग आणि कचरा असल्यास सापांना लपण्यासाठी जागा मिळू शकते. म्हणून तुमच्या घराच्या आसपास असं काही ठेवू नये.

3 / 5

सापांना जंगलातील एक वनस्पती आहे, जी तुम्ही घराच्या बाजूला लावली की साप पळून जातात असं बोललं जातं. या वनस्पतीचे नाव कॅक्टस असे आहे. ही वनस्पती प्रामुख्याने कोरड्या आणि उष्ण प्रदेशात आढळते. काही प्रजाती जंगलातही आढळतात. कमी पाण्यात तग धरून राहण्याची क्षमता हे या वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे.

4 / 5

अनेक ठिकाणी घराच्या आसपास कॅक्टसची झाडे लावल्याने साप घरात येत नाहीत, असा समज आहे. कॅक्टसला असलेले तीक्ष्ण काटे सापांना अडथळा ठरतील, असे लोकांना वाटते. मात्र, घराजवळ कॅक्टस लावल्याने साप घरात येत नाहीत, याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. साप कॅक्टसच्या काट्यांमुळेच दूर राहतात, असे निश्चितपणे सांगता येत नाही.

5 / 5

त्यामुळे सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी केवळ कॅक्टसवर अवलंबून राहू नका. घराचा परिसर स्वच्छ ठेवा, भिंतींमधील फटी बंद करा आणि उंदरांचा प्रादुर्भाव रोखा. साप आढळल्यास त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता स्थानिक सर्पमित्रांची मदत घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us