ही वनस्पती म्हणजे सापाचा विनाश, घरात दिसतात कोब्रा धूम ठोकतो!
म्हणूनच घरात साप येऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सापाने घरात प्रवेश करू नये यासाठी तुमच्या घरात कुठे भेगा असतील तर त्या बुजाव्यात, कुठे छिद्र असेल किंवा अडगळीचे सामान असेल तर ते हटवून टाकावे. घर स्वच्छ करावे. त्यामुळे साप येण्याची शक्यता कमी होते.

पावसाळा आता अगदी तोंडावर आला आहे. पाऊस आला की सगळीकडे हिरवळ दाटते. गवत, झाडं हिरवीगार होतात. त्यामुळे या काळात कीटक, सरपटणारे प्राणीदेखील त्यांच्या घरातून बाहेर येतात. साप हा सरपटणारा प्राणी तर माणसांसाठी खूपच डोकेदुखी ठरतो.

पाऊस आला की साप बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे तुमच्या घराच्या आजूबाजूला गार्डन असेल, झाडं असतील तर साप तुमच्या घरात घुसण्याची दाट शक्यता असते. अनेकदा तुम्ही घरात एखाद्या अनपेक्षित जागेवर गेल्यानंतर तुम्हाला अचानकपणे मोठा साप दिसतो. असे प्रकार तुमच्यासोबत अनेकदा घडले असतील.

म्हणूनच घरात साप येऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सापाने घरात प्रवेश करू नये यासाठी तुमच्या घरात कुठे भेगा असतील तर त्या बुजाव्यात, कुठे छिद्र असेल किंवा अडगळीचे सामान असेल तर ते हटवून टाकावे. घर स्वच्छ करावे. त्यामुळे साप येण्याची शक्यता कमी होते.

दरम्यान, साप घरात येऊ नये म्हणून तुम्ही खिडक्यांना जाळ्यादेखील लावू शकता. तुमचे घर निटनेटके ठेवले तर साप येण्याची शक्यता कमी होते. परंतु एक वनस्पती अशी आहे, ती जर तुम्ही घरात लावली तर साप घरात येत नाही.

सापाला नागफणी ही वनस्पती आवडत नाही, असे म्हटले जाते. या वनस्पतीचा गंध आला की साप दूर पळतो, असे सांगितले जाते. त्यामुळे तुमच्या बगीच्यात, घरात कुंडीमध्ये ही वनस्पती लावू शकता. त्यामुळे साप घरात येणार नाही. तुमचे सापापासून रक्षण होऊ शकते.