
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक या विवासोहळ्यास येताना दिसत आहेत.

बाॅलिवूडच्या काही कलाकारांना देखील या विवाहसोहळ्याचे आमंत्रण आहे. सलमान खान, शाहरूख खान हे जामनगरकडे रवाना देखील झाले आहेत.

आता नुकताच रणबीर कपूर हा आपल्या कुटुंबासोबत जामनगरकडे रवाना झालाय. आता याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

यावेळी रणबीर कपूर याच्यासोबत आलिया भट्ट आणि नीतू कपूर या देखील दिसत आहेत. यांचे फोटो हे चांगलेच व्हायरल होत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बघायला मिळतंय. अनेक लोक या विवाहसोहळ्यासाठी पोहचले आहेत.