
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) पती आनंद आहुजा आणि मुलगा वायू यांच्यासोबत नुकताचं लंडन येथील नॉटिल हिल याठिकाणी शिफ्ट झाली आहे. अभिनेत्रीने स्वतःचे मदर्स डे मोठ्या थाटात साजरा केला.

लंडनमध्ये शिफ्ट झाल्यानंतर अभिनेत्रीने घरी डीनर पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यासाठी अभिनेत्रीने घराला फुलांनी सजवलं होतं. अभिनेत्रीच्या पार्टीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

सोनमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या लंडन येथील घराची एक झलक दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या घराची चर्चा आहे.

लंडन येथे एका भव्य घरात अभिनेत्री राहते. अभिनेत्री घराला महागड्या वस्तूंनी सजवलं आहे. सध्या सर्वत्र सोनम आणि तिच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे.
