ओटीटीवर धुमाकूळ! घर बसल्या पाहा साऊथचे हे हिट सिनेमे
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन कंटेन्ट प्रदर्शित होत असतो. त्यामध्ये रोमँटिक कॉमेडी, कॉमेडी ड्रामा, डेटिंग ॲप्सच्या दुनियेवरील आधारित सिनेमे देखील असतात. आता ॲक्शन थ्रिलर अशा विविध जॉनरमधील चित्रपट आणि वेब सीरिज या आठवड्यात वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. जाणून घेऊया या आठवड्यात कोणते चित्रपट आणि सीरिज कुठे पाहता येणार आहेत.

‘'बेथलहेम कुडुंबा युनिट' हा दाक्षिणात्य रोमँटिक-कॉमेडी-ड्रामा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. गिरीश ए.डी. यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात निविन पॉली, ममिता बायजू, संगीत प्रताप, रोशन शनावास, श्याम मोहन, सुरेश कृष्णा, विनय फोर्ट, श्रींदा आणि मीनाक्षी रवींद्रन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'लीस्ट एलिजिबल बॅचलर' (Least Eligible Bachelor) ही एक तेलुगू कॉमेडी-ड्रामा मालिका आहे. ती लग्नासाठी दबाव असलेल्या एका मध्यमवर्गीय तरुणाची कथा सांगते. बाबू देगाला यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत हर्ष चेमुडू, हायपर आदी, ऐश्वर्या होलाकला आणि जीवन कुमार यांनी भूमिका साकारल्या आहेत. ही मालिका 30 सप्टेंबरपासून 'ईटीव्ही विन' (ETV Win) वर प्रदर्शित झाली आहे.
1 ऑक्टोबरपासून तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘रोमांचकम’ (Romanchakam) पाहू शकता. या चित्रपटाची कथा एका अभियंत्याभोवती फिरते, जो आपली उद्योजकीय कौशल्ये सिद्ध करण्यासाठी डेटिंग ॲप सुरू करतो. वेणुगोपाल रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सुमंत प्रभास, अवंतिका सुनील कुमार आणि उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘#Love’ हा डेटिंग ॲप्सच्या विश्वावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. याची कथा ‘FOUND’ आणि ‘Find My Bae’ या डेटिंग प्लॅटफॉर्म्सचे संस्थापक असलेल्या तारा आणि मॅथ्यू यांच्याभोवती फिरते. या चित्रपटात अर्जुन दास आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
‘सरदार 2’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात कार्ती, एस. जे. सूर्या, मालविका मोहनन, आशिका रंगनाथ, राजिशा विजयन आणि मुनीशकांत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट अनुभवी अधिकारी चंद्र बोस आणि त्यांचा मुलगा विजय प्रकाश यांची कथा मांडतो. हा चित्रपट 1 ऑक्टोबर पासून प्राइम व्हिडिओ (Prime Video) वर प्रदर्शित होईल.