IND vs NZ | न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय फलंदाज
India vs New Zealand | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाच्या ज्या 5 फलंदाजांनी न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत, त्यांच्याबाबत आपण जाणून घेऊयात.
1 / 5

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने न्यूझीलंड विरुद्ध 42 सामन्यांमध्ये 1 हजार 750 धावा केल्या आहेत.
2 / 5

विराट कोहली न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने 29 सामन्यांमध्ये 1 हजार 433 धावा केल्या आहेत.
3 / 5

वीरेंद्र सेहवाग या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सेहवागच्या नावावर न्यूझीलंड विरुद्ध 23 सामन्यांमध्ये 1 हजार 157 धावांची नोंद आहे.
4 / 5

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे. अझहरुद्दीनने 40 सामन्यात 1 हजार 118 धावा केल्या आहेत.
5 / 5

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 32 सामन्यांमध्ये 1 हजार 79 धावा केल्या आहेत. गांगुलीने 35.96 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत.
Follow Us