
कोणत्याही खेळात खेळाडूंनी नियमांचं उल्लंघन केलं की त्याच्यावर कारवाई केली जाते. फुटबॉल मैदानात तर रेड कार्ड दाखवून बाहेरचा रस्ता दाखवला जातो. पण कधी पंचांना बॅन केल्याचं ऐकलं आहे का? असं ऑस्ट्रेलियात घडलं आहे. (फोटो-इंस्टाग्राम)

ऑस्ट्रेलिया फुटबॉल लीगचे पंच लेह हॉसेन यांना एक ड्रेस परिधान करणं महागात पडलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर थेट बंदी घालण्यात आली आहे. (फोटो-इंस्टाग्राम)

लेह हॉसेन लीगच्या पोस्ट सिझन कार्यक्रमात ओसामा बिन लादेनचा ड्रेस परिधान करून गेले होते. लादेनसारखा ड्रेस परिधान केल्याने खूपच वाद झाला. (फोटो-इंस्टाग्राम)

लेह हॉसेन यांना या बाबत शिक्षा मिळाली आहे. एएफएलच्या पुढच्या सिझनच्या पहिल्या फेरीसाठी बंदी घालण्यात आली आहे. आता दुसऱ्या फेरीपासून ते पंचगिरी करताना दिसतील. (फोटो-इंस्टाग्राम)

लेह हॉसेन यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागताना सांगितलं की, त्यांचा कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. (फोटो-इंस्टाग्राम)