T20 Ranking: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा विराटला रँकिगमध्येही फटका, पाकिस्तानच्या रिजवानने टाकलं मागे

| Updated on: Oct 27, 2021 | 4:37 PM

टी20 विश्वचषकाच्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाच्या पहिल्याच सामन्यात पाकने भारताला तब्बल 10 विकेट्सनी मात देत विजय मिळवला.

1 / 5
बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अखेर पार पडला. दोन वर्षानंतर मैदानावर आमने-सामने आल्यानंतर भारताला मात्र तब्बल 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार विराटच्या संघाला स्वीकाराव्या लागलेल्या या पराभवानंतर विराटला आणखी एक धक्का बसला आहे. टी20 फलंदाजांच्या रँकिंगमध्येही पाकच्या रिजवानने त्याला मागे टाकलं आहे.

2 / 5
सामन्यात कोहलीने 57 धावांची खेळी केली. तर रिजवानने 55 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार खेचत नाबाद 79 धावा केल्या.  ज्यामुळे रिजवान आयसीसी रँकिगमध्ये 3 स्थान वर जात चौथ्या स्थानावर गेला. तर विराट चौथ्यावरुन एक स्थान खाली पाचव्या स्थानावर आला.

3 / 5
विराटसह टॉप 10 मध्ये असणारा भारतीय फलंदाज  केएल राहुललाही नुकसान झालं आहे. केवळ 3 धावा केल्यामुळे राहुल 2 स्थान खाली जात 8 व्या स्थानावर गेला आहे.

4 / 5
रिजवानसह दक्षिण आफ्रिकेच्या एडिन माक्ररमलाही चांगला फायदा झाला आहे. तो तब्बल 8 स्थान वर जात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

5 / 5
तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचलाही नुकसान झालं आहे. तो तिसऱ्या स्थानावरुन 3 स्थान खाली उतरत 6 व्या स्थानावर पोहचला आहे.