
प्री-वेडिंग प्रमाणे या सेरेमनीला सुद्धा अनेक स्टार्स हजर होते. अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. टीम इंडियाचा माजी कॅप्टन एमएस धोनीसह अनेक क्रिकेटपटू सुद्धा संगीत सेरेमनीमध्ये सहभागी झाले होते.

प्रसिद्ध सिंगर जस्टिन बिबरच्या कार्यक्रमाने रंगत आणली. अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीला महेंद्रसिंह धोनी पत्नी साक्षीसोबत उपस्थित होता.

त्याशिवाय T20 वर्ल्ड कप स्कवाडमधील सूर्युकमार यादव आणि हार्दिक पंड्या सुद्धा हजर होते. हार्दिक सोबत त्याचा भाऊ क्रुणाल पंड्या सुद्धा आलेला.

सूर्यकुमार यादव पापाराजीसोबत सेल्फी घेताना दिसला. टीम इंडियाच्या बाहेर असलेला इशान किशन सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता.

केएल राहुल पत्नी अथिया शेट्टीसोबत या कार्यक्रमाला पोहोचलेला. आयपीएल 2024 चे विजेते आणि केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर सुद्धा हजर होता.