
ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील सलग तिसरा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध 3 मोठे रेकॉर्ड केले.

ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्स विरुद्ध 309 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय ठरला.

त्याआधी ग्लेन मॅक्सवेल याने वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक ठोकलं. मॅक्सवेलने 40 बॉलमध्ये शतक करत सर्वांना मागे टाकलं. मॅक्सवेलने 44 बॉलमध्ये 106 धावा केल्या.

डेव्हिड वॉर्नर याने सलग दुसरं आणि वर्ल्ड कपमधील सहावं शतक ठोकलं. वॉर्नर यासह वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला.

दरम्यान ऑस्ट्रेलिया तिसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे.