अर्धशतक हुकलं पण बाबर आझमने विराट कोहलीला टाकलं मागे, असा नोंदवला रेकॉर्ड

ट्राय सीरिजमधील अंतिम फेरीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने 49.3 षटकात सर्व गडी गमवून 242 धावा केल्या आणि विजयासाठी 243 धावांचं आव्हान दिलं. बाबर आझमने या सामन्यात 29 धावा केल्या पण एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

| Updated on: Feb 14, 2025 | 6:26 PM
1 / 5
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना होत आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्व गडी गमवून 242 धावा केल्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 243 धावांचं आव्हान आहे. आता कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. पण बाबर आझमने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

2 / 5
बाबर आझमने अंतिम सामन्यात 29 धावांची खेळी केली. पण या खेळीसह त्याने रनमशिन्स विराट कोहलीला मागे टाकलं आहे. बाबर आझमने सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला आणि एका खास पंगतीत जाऊन बसला. 14 धावा करताच बाबर आझमने एक विक्रमी पल्ला गाठला.

3 / 5
बाबर आझमने वनडे क्रिकेटमध्ये 6000 धावांचा पल्ला गाठला आले. बाबर आझमने या धावा 123 व्या डावात गाठल्या आहेत. तर विराट कोहलीने 6000 धावांचा पल्ला 126 व्या डावात पूर्ण केला होता.

4 / 5
बाबर आझमने सर्वात वेगाने 5000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 97 सामन्यात ही कामगिरी केली होती. पण 2023 वनडे वर्ल्डकपनंतर त्याचा फॉर्म खराब झाला आहे. मागच्या 7 वनडे सामन्यात तर फक्त दोनदाच अर्धशतक ठोकलं आहे.

5 / 5
सर्वात वेगाने 6000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये हाशिम आमला आणि बाबर आझम संयुक्तिकरित्या पहिल्या स्थानावर आहेत. या दोघांनी 123 डावात ही कामगिरी केली. विराट कोहलीने 136, केन विल्यमसनने 139 आणि डेविड वॉर्नरने 139 धावात ही कामगिरी केली होती.