IPL 2025 : आयपीएलमध्ये नवा नियम लागू, आता खेळाडूंना असं करता येणार नाही
आयपीएलच्या १८ व्या पर्वात बीसीसीआयने नव्या नियमाची अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ मार्चपासून नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सामना होणार आहे. पण या स्पर्धेत नवा नियम लागू होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग सीझन १८ सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने नवीन नियम लागू केले आहेत. नियमानुसार खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा जवळच्या मित्रांना आता ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळणार नाही. सर्व खेळाडूंना टीम बसमधून प्रवास करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.

सामन्यादरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना सीमारेषेजवळील एलईडी बोर्डांसमोर बसू नये असे सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येकाला डगआउटमध्ये असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप मिळवणाऱ्या खेळाडूंना पहिल्या दोन षटकांसाठी घालणे आवश्यक आहे. त्यानंतर, हवे असल्यास टोपी बदलण्याची परवानगी आहे. याशिवाय न घालता मैदानावर जाऊ शकत नाही.

सामन्यानंतर होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात स्लीव्हलेस जर्सी आणि फ्लॉपी हॅट्स घालण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणाही करण्यात आली आहे. जर पहिल्यांदाच या नियमाचे उल्लंघन झाले तर इशारा दिला जाईल आणि जर तीच चूक पुन्हा झाली तर दंड आकारला जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

२२ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या आवृत्तीपूर्वी बीसीसीआयने कडक नियम लागू केले आहेत. या नियमामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये शिस्त वाढेल.