नेमका कोणाला मारला टोमणा? शुबमन गिलने फिटनेसवर केलं भाष्य, पण…

भारताने इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका 1-2 ने गमावली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजयाच्या अपेक्षा होत्या. पण मधळी फळी फेल गेली आणि सामना हातून गमावला. या मालिकेतील पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने संघाच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

| Updated on: Jul 20, 2026 | 8:51 PM
1 / 5
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली. खरं तर वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सलग दोन पराभव झाले आणि मालिका हातून गेली. असं असताना कर्णधार शुबमन गिलने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला. गिलच्या मते, टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस योग्य नाही, त्यामुळे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी घातक ठरू शकते.  (Photo: PTI)

2 / 5

शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर सांगितलं की , वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला सलग 11 सामने खेळायचे आहेत. पण टीम इंडियातील काही खेळाडू 2-3 सामन्यांची मालिकाही पूर्ण खेळत नाहीत. गिलने सांगितलं की, खेळाडूंना फिटनेसवर काम करावं लागेल. (Photo: PTI)

3 / 5

इंग्लंड दौऱ्यात हार्षित राणा, वरूण चक्रवर्ती दुखापतग्रस्त आहे. त्यानंतर केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदरही जखमी झाले. तर नितीश कुमार रेड्डी मालिकेपूर्वीच दुखापतीने त्रस्त असल्याने दौऱ्यातून बाहेर पडला. (Photo: PTI)

4 / 5

कर्णधार शुबमन गिलच्या फिटनेसचा देखील प्रश्न आहे. वनडे मालिकेतील तीन पैकी दोन सामन्यात त्याला त्रास झाला. दोन सामन्यात गिलने अर्धशतक ठोकलं, पण हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवत होता. त्यात पहिल्या सामन्यात रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे कर्णधारही फिट नाही. (Photo: PTI)

5 / 5

लॉर्ड्स वनडे सामन्यात रोहित शर्माही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसला. पण श्रेयस अय्यर आणि विराट कोहली मात्र फिट दिसले. अक्षर पटेलचं फिटनेसही चांगलं होतं. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us