
इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या पाचव्या सामन्यातून पाचव्या खेळाडूने टीम इंडियासाठी पदार्पण केलं आहे.

देवदत्त पडीक्कल या युवा फलंदाजाने टेस्ट डेब्यू केलंय. देवदत्त इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेतून पदार्पण करणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरलाय. देवदत्त भारताचा 314 वा खेळाडू ठरला आहे. देवदत्तला रजत पाटीदार याच्या जागी टीममध्ये संधी देण्यात आली आहे.

आर अश्विन याचा हा 100 वा कसोटी सामना आहे. आर अश्विन याने देवदत्तला कॅप दिली.

देवदत्त याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 53 डावांमध्ये 6 शतकं आणि 12 अर्धशतकासह 2 हजार 227 धावा केल्या आहेत.

देवदत्तच्या आधी इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेतून रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान आणि आकाश दीप या चौघांनी पदार्पण केलं.