भारतीय लष्कराच्या जवानाची सुवर्ण कामगिरी; 16 वर्षांनंतर भारताला जिंकवून दिला वर्ल्ड कप

25 वर्षीय धीरज बोमादेवरा यांनी तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे ते भारताचे पहिले पुरुष रिकर्व तीरंदाज बनले आहेत.

| Updated on: Sep 14, 2026 | 2:48 PM
1 / 5
25 वर्षीय धीरज बोमादेवरा याने जागतिक व्यासपीठावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तीरंदाजी वर्ल्डकप जिंकणारे पहिले रिकर्व आर्चर ठरला आहे. जागतिक मंचावर देशाची मान उंचावणारे धीरज बोमादेवरा हे भारतीय लष्करामध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 2021 मध्ये लष्करात प्रवेश केला होता. (Photo: PTI)

2 / 5

धीरज यांनी या सुवर्णपदकासह भारताची तब्बल 16 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. यापूर्वी 2010 मध्ये जयंत तालुकदार यांनी पुरुष रिकर्व प्रकारात कांस्यपदक जिंकले होते, ज्याला आता धीरज यांनी सुवर्ण रंगात बदलले आहे. (Photo: PTI)

3 / 5

जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या धीरज यांचा अंतिम सामना जगातील 20व्या क्रमांकाचा जपानी तीरंदाज नाकानिशी जुन्या याच्याशी झाला. या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अखेर 'शूट-ऑफ'मध्ये धीरज यांनी जपानच्या खेळाडूचा पराभव करत विजय मिळवला. (Photo: PTI)

4 / 5

धीरज बोमादेवरा यांना 2023 आणि 2024 च्या आर्चरी वर्ल्ड कपमधून रिकाम्या हाताने परतावे लागले होते. मात्र, या वेळी त्यांनी कोणतीही चूक न करता आपल्या उत्कृष्ट फॉर्मच्या जोरावर थेट सुवर्णपदकावर अचूक निशाणा साधला. (Photo: PTI)

5 / 5

हवालदार धीरज यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे जागतिक तिरंदाजीच्या नकाशावर भारतीय पुरुष रिकर्व संघाने आपले स्थान मजबूत केले असून, देशातील तरुण खेळाडूंसाठी हा एक नवा मैलाचा दगड ठरला आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us